James Anderson : वय वर्ष 41 अन् सहाव्यांदा भारतात; आजवर क्रिकेट इतिहासात न घडलेला पराक्रम करण्यास सज्ज!
आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 183 कसोटी सामन्यांच्या 341 डावांमध्ये गोलंदाजी करताना अँडरसनने 26.42 च्या सरासरीने 690 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला 700 विकेट्स घेण्यासाठी फक्त 10 विकेट्सची गरज आहे.
James Anderson : जेम्स अँडरसन अनेक वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये आपली क्षमता सिद्ध करत आहे. अँडरसन हा क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक कसोटी खेळणारा दुसरा आणि इंग्लंडचा पहिला खेळाडू आहे. आतापर्यंत त्याने 183 सामने खेळले आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. जेम्स अँडरसन सहाव्यांदा भारत दौऱ्यावर आला आहे. दुसऱ्या कसोटीसाठी अँडरसनचा इंग्लंड संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अँडरसनला भीम पराक्रम करण्याची संधी आहे.
- 2006 Test tour.
— Johns. (@CricCrazyJohns) February 1, 2024
- 2008 Test tour.
- 2012 Test tour.
- 2016 Test tour.
- 2021 Test tour.
- 2024 Test tour.
James Anderson will be playing his 6th Test tour in India tomorrow - The 🐐 of England. pic.twitter.com/LsOcDPaHRz
700 विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज होऊ शकतो
आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 183 कसोटी सामन्यांच्या 341 डावांमध्ये गोलंदाजी करताना अँडरसनने 26.42 च्या सरासरीने 690 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला 700 विकेट्स घेण्यासाठी फक्त 10 विकेट्सची गरज आहे. अँडरसन 700 विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरू शकतो. आतापर्यंत कोणत्याही वेगवान गोलंदाजाला हा आकडा स्पर्श करता आलेला नाही.
Rohit Sharma vs James Anderson in the 2021 Test series:
— Johns. (@CricCrazyJohns) February 1, 2024
Runs - 82
Balls - 291
Fours - 8
Average - 82
Out - 1 pic.twitter.com/kfhBpkS7lB
पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला गेला त्यामध्ये अँडरसनला इंग्लंडच्या अंतिम संघात स्थान देण्यात आले नव्हते. विशाखापट्टणम येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने जेम्स अँडरसनला संधी देण्यात आली आहे. उद्या 02 फेब्रुवारीपासून दुसरी कसोटी सुरू होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने मार्क वुडला संधी देण्यात आली, पण एकही विकेट घेता आली नाही.
जेम्स अँडरसनने 2006 मध्ये पहिल्यांदा भारताला कसोटी मालिकेसाठी भेट दिली होती. म्हणजेच अँडरसनने पहिल्यांदा भारताचा कसोटी मालिकेसाठी दौरा केला तेव्हा सध्याच्या भारतीय संघातील (इंग्लंड कसोटी मालिकेसाठी) कोणत्याही खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणही केले नव्हते. त्याने 2008 मध्ये कसोटी मालिकेसाठी दुसरा, 2012 मध्ये तिसरा, 2016 मध्ये चौथा, 2021 मध्ये पाचवा आणि 2024 मध्ये सहावा भारत दौरा केला.
इतर महत्वाच्या बातम्या