IND vs ENG 1st Test : दुसरा दिवसही भारताच्या नावावर; केएल राहुल-जाडेजाची फटकेबाजी, भारताकडे 175 धावांची आघाडी
IND vs ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारताने सामन्यात 175 धावांची आघाडी घेत सामन्यावरिल पकड मजबूत केली आहे.
IND vs ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारताने सामन्यात 175 धावांची आघाडी घेत सामन्यावरिल पकड मजबूत केली आहे. दुसऱ्या दिवस संपेपर्यंत भारताने पहिल्या डावात 7 विकेट गमावत 421 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताकडे एकूण 175 धावांची आघाडी झाली आहे. भारताकडून रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेल अजूनही क्रिजवर आहेत.
जाडेजा आणि केएल राहुलची फटकेबाजी
दुसऱ्या दिवशी रवींद्र जाडेजा आणि केएल राहुल यांनी जोरदार फटकेबाजी केली. केएल राहुलने 86 धावांचे योगदान दिले. तर रवींद्र जाडेजा 155 चेंडूमध्ये 81 धावा करत क्रीजवर टिकून आहे. पहिल्या दिवशी जोरदार फटकेबाजी केल्यानंतर यशस्वी जैस्वाल 80 धावा करत बाद झाला. त्याला जो रुटने स्वत: गोलंदाजी करत बाद केले. त्यानंतर टीम इंडियाची धावसंख्या 2 बाद 123 इतकी झाली होती. त्यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिलने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, गिलही केवळ 23 धावा करुन बाद झाला. त्यानंतर केएल राहुलने श्रेयस अय्यर सोबत 64 धावांची भागिदारी रचली.
श्रेयस अय्यर चांगली फलंदाजी करत असताना तो देखील 35 धावा करत बाद झाला. त्यानंतर केएस भरत आणि राहुलने भारताचा डाव सावरला. त्यांनी 65 धावांची भागिदारी रचली. केएल राहुलचे शतक केवळ 14 धावांनी हुकले त्याने 123 चेंडूमध्ये 86 धावा केल्या. यामध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. केएस भरतही 41 धावा करत बाद झाला.
5⃣0⃣ for @imjadeja - his 20th in Test cricket! 👏 👏
— BCCI (@BCCI) January 26, 2024
This has been a fine knock 👌👌#TeamIndia move closer to 340-run mark.
Follow the match ▶️ https://t.co/HGTxXf7Dc6#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/KwKywRUnEF
पहिल्या दिवसही भारताने केला होता नावावर
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडला सर्वबाद 246 पर्यंत मजल मारता आली होती. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने दिवस संपेपर्यत 1 बाद 119 धावांपर्यंत मजल मारली आहे. मात्र, भारताने आक्रमक गोलंदाजी आणि फलंदाजी करत आजचा दिवस आपल्या नावावर केला होता. भारताकडून रोहित शर्मा 27 चेंडूमध्ये 24 धावा करत बाद झाला. तर यशस्वी जैस्वाल 70 चेंडूमध्ये 76 आणि शुभमन गिल 43 चेंडूमध्ये 14 धावा करत क्रिजवर टिकून होते.
A half-century partnership! 👌 👌@imjadeja 🤝 @KonaBharat
— BCCI (@BCCI) January 26, 2024
Follow the match ▶️ https://t.co/HGTxXf7Dc6#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/H8NZhzP5x4
इतर महत्वाच्या बातम्या