Fact Check : मुनव्वर फारुकीला मारहाण झाल्याचा दावा करत व्हिडीओ व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Fact Check: विश्वास न्यूजनं केलेल्या पडताळणीत आढळलं की व्हायरल होत असलेला व्हिडीओ कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा नाही. त्या व्हिडीओतील युवकाचं नाव सदाकत आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज) : सोशल मीडियावर एक व्हिडीओ वारंवार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलीस एका युवकाला त्यांच्या दुचाकीवर बसवून घेऊन जात असताना पाहायला मिळतं. मात्र, त्याचवेळी एक व्यक्ती त्या युवकावर हल्ला करते. हा व्हिडीओ शेअर करत सोशल मीडिया यूजर्स दावा करत आहेत की मारहाण झालेला युवक कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा आहे ज्याला वकिलांनी मारलं आहे.
विश्वास न्यूजला पडताळणीत हे आढळलं की व्हायरल होत असलेला दावा चुकीचा आहे. हा व्हिडीओ मुनव्वर फारुकीचा नाही. व्हिडीओतील युवकाचं नाव सदाकत आहे. या व्हिडीओला यापूर्वी देखील अनेकदा मुनव्वर फारुकीचा असल्यास सांगत चुकीचा दावा कर पसरवण्यात आलं आहे.
व्हायरल पोस्टमध्ये काय?
एका फेसबुक यूजरनं व्हायरल पोस्ट शेअर करत लिहिलं की,'देवी देवतांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या मुनव्वर फारुकीला पहिल्यांदा सामान्य जनतेनं धुतलं,यानंतर एका वकिलानं थांबवून तीनदा कानाखाली मारल्या. मी याचा निषेध करतो त्याला खाली उतरवून लाथांनी मारायला हवं होतं.
पोस्टचं अर्काइव वर्जन इथं पाहा
पडताळणी
विश्वास न्यूजनं पडताळणी सुरु करताच व्हिडीओची काळजीपूर्वक पाहणी केली. व्हिडओत दिसणारा युवक मुनव्वर फारुकपेक्षा वेगळा असल्याचं पाहायला मिळतं. व्हिडीओचं सत्य जाणून घेण्यासाठी त्याच्या कीफ्रेम्स काढल्या आणि गुगल लेन्स द्वारे सर्च केल्या. सर्च करताच व्हिडीओ काही न्यूज वेबसाईट आणि यूट्यूब चॅनेलवर चार वर्षांपूर्वी असल्याचं पाहायला मिळालं. एनडीटीव्हीच्या वेबसाइटनुसार इंदोरमध्ये मध्ये स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीनं देवी देवतांचा अपमान केल्यानं अटक करण्यात आली असून कोर्ट परिसरातील लोकांनी फारुकीचा मित्र सदाकत याच्यावर मुनव्वर फारुकी समजून हल्ला केला. त्या संदर्भातील पूर्ण बातमी देखील उपलब्ध आहे.
आम्ही या आधारे आणखी पडतालणी केली असता आणखी एका यूट्यूब चॅनेलवर अपलोड असलेला एक व्हिडीओ पाहायला मिळाला. त्यात त्या युवकाचं नाव सदाकत असल्याचं स्पष्ट होतं. युवकाला मुनव्वर फारुकी समजून त्याच्यावर हल्ला केला.
हा व्हिडीओ यापूर्वी देखील व्हायरल झालेला आहे. इंदौरच्या तुकोगंजच्या तत्कालीन पोलीस अधिकारी कमलेश शर्मा यांच्याशी संपर्क केला त्यावेळी त्यांनी व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत मुनव्वर फारुकी नसून त्याचा मित्र सदाकत असल्याचं म्हटलं.
दैनिक जागरणच्या 3 जानेवारी 2021 च्या बातमीनुसार मुनव्वर फारुकीला हिंदू देवी देवता आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आपत्तीजनक कमेंट केल्यानं इंदौर पोलिसांनी अटक केली होती. पूर्ण बातमी देखील उपलब्ध आहे.
फेक पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक यूजरचं सोशल स्कॅनिंग केलं असता, हा व्यक्ती विशेष विचारधारेशी संबंधित पोस्ट शेअर करतो.
निष्कर्ष : विश्वास न्यूजच्या पडताळणीत असं स्पष्ट झालं की व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. हा व्हिडीओ मुनव्वर फारुकींचा नाही. या व्हिडीओतील युवकाचं नाव सदाकत आहे. हा व्हिडीओ 2021 चा आहे, जेव्हा देवी देवतांच्या अपमानाप्रकरणी मुनव्वर फारुकीला अटक करण्यात आली होती. कोर्टाच्या आवारात काही लोकांनी फारुकीचा मित्र सदाकत याला मुनव्वर समजून मारहाण केली होती. जुनाच व्हिडीओ पुन्हा वेगवेगळे दावे करुन व्हायरल होत आहे.
Claim Review : कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा हा व्हिडीओ आहे, ज्याला वकिलांनी मारलं.
Claimed By :FB User - Janardan Mishra
Fact Check : असत्य (फेक)
[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा विश्वास न्यूजवर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]