एक्स्प्लोर

IND vs AFG 2nd T20 : वर्ल्डकपपूर्वी शेवट गोड करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार; रोहित शर्मा सुद्धा महारेकाॅर्ड करणार!

IND vs AFG 2nd T20 : भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) दरम्यान 3 सामन्यांची टी 20 मालिका (T20 Series) खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यात भारताने दिमाखदार विजय मिळवला होता. मालिकेतील दुसरा सामना आज खेळवण्यात येणार आहे.

IND vs AFG 2nd T20 : भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) दरम्यान 3 सामन्यांची टी20 मालिका (T20 Series) खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यात भारताने दिमाखदार विजय मिळवला होता. मालिकेतील दुसरा सामना आज खेळवण्यात येणार आहे. इंदुरच्या होळकर स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. टीम इंडिया (Team India) मालिकेतील दुसरा विजय मिळवत मालिका खिशात घालण्याचा इराद्याने मैदानात उतरणार आहे. मोहालीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात विजय मिळवत. भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती. आजचा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. टीम इंडियासाठी वर्ल्डकपपूर्वी खेळवली जात असलेली शेवटची टी 20 मालिका आहे. 

कोहली 14 महिन्यांनंतर टी 20 सामन्यासाठी मैदानात 

मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीही मैदानात उतरणार आहे. मालिकेतील पहिला सामना कौटुंबिक कारणामुळे तो खेळू शकलेला नव्हता. मात्र, आता तो भारतीय संघाच्या ताफ्यात दाखल झाला आहे. कोहली 14 महिन्यांनंतर टी 20 सामना खेळणार असल्याने सर्वांच्या नजरा त्याच्यावर असणार आहेत. 

मैदानावर उतरताच रोहितच्या नावावर होणार विक्रम 

आजच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सर्वांचे लक्ष कर्णधार रोहित शर्मावर असणार आहे. रोहित शर्मा आज मोठ्या विक्रमांना गवसणी घालणार आहे. रोहित टी 20 फॉरमॅटमध्ये 150 सामने खेळणारा पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरणार आहे. रोहितने आत्तापर्यंत 149 सामने खेळले आहेत. रोहितनंतर सर्वाधिका सामने खेळणाऱ्यांच्या यादीत आयर्लंडच्या खेळाडूचा समावेश आहे. पॉल स्टर्लिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 134 सामने खेळले आहेत. त्यानंतर पाकिस्तानच्या शोएब मलिकने 124 तर मार्टिन गुप्टीलने 122 सामने खेळले आहेत.

वर्ल्डकपपूर्वी शेवटची टी 20 मालिका 

जून 2024 मध्ये खेळवण्यात येणाऱ्या टी 20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ही शेवटची टी20 मालिका खेळत आहे. यानंतर विश्वचषकातच टीम इंडिया टी 20 सामना खेळताना दिसणार आहे. दरम्यान त्यापूर्वी आयपीएल 2024 चा हंगाम देखील आहे. विश्वचषकासाठी कोणत्या खेळाडूंना संधी मिळते? याकडे सर्वांचे लक्ष आहे. अक्षर पटेल, जितेश शर्मा यांना टी 20 मध्ये स्वत;ला सिद्ध करावे लागणार आहे. 

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, आवेश खान, मुकेश कुमार

इतर महत्वाच्या बातम्या 

Yuvraj Singh on Rohit and Hardik : मुंबईचा सेनापती बदलल्याने रोहित-हार्दिकमध्ये अहंकार उफाळून येणार? सिक्सर किंग युवराजनं दिलं त्याच्याच भाषेत उत्तर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7  मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7 मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षातील नक्की नातं काय?Nagpur Crime : पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या, पोलिसांनी फोडलं बिंगSpecial Report on Mohan Bhagwat : कुंभमेळ्यात भागवतांविरोधात आखाडा? संघात काडी टाकण्याचा प्रयत्न?Special Report Asha Pawar:पवार कुटुंबात बदल होणार,अजितदादांच्या मातोश्रींची छोटी सी आशा पूर्ण होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7  मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7 मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Adani Group News: तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली 
तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
Embed widget