Yuvraj Singh on Rohit and Hardik : मुंबईचा सेनापती बदलल्याने रोहित-हार्दिकमध्ये अहंकार उफाळून येणार? सिक्सर किंग युवराजनं दिलं त्याच्याच भाषेत उत्तर!
Yuvraj Singh on Rohit vs Hardik : हार्दिक पांड्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत असे. रोहितच्या नेतृत्वाखाली तो एक मजबूत अष्टपैलू खेळाडू बनला.
Yuvraj Singh on Rohit vs Hardik : IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार आहे. त्याने टीम इंडियाचा नियमित कॅप्टन रोहित शर्माची जागा घेतली. रोहित आता हार्दिकच्या नेतृत्वाखाली येणार आहे. हार्दिक केवळ कर्णधार बनण्याच्या अटीवर मुंबई इंडियन्समध्ये आला होता. जेव्हा त्याची गुजरात टायटन्समधून मुंबई फ्रँचायझीमध्ये बदली करण्यात आली आणि त्याला कर्णधार बनवण्यात आले तेव्हा रोहित शर्माच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर हार्दिकवर हल्ला चढवला होता. हार्दिकला हिटमॅनऐवजी कर्णधार बनवणे चाहत्यांना आवडलेलं नाही.
यानंतर टी-20 वर्ल्डकपमध्येही हार्दिकची कर्णधार होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. याचा अर्थ टीम इंडियातही रोहितला हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळावे लागू शकते. हार्दिक पांड्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत असे. रोहितच्या नेतृत्वाखाली तो एक मजबूत अष्टपैलू खेळाडू बनला. दोघांमध्ये चांगले बॉन्डिंग झाले आहे पण आता ही केमिस्ट्री अशीच राहणार का? गेल्या काही आठवड्यांपासून ही चर्चा सुरू आहे. याबाबत माजी क्रिकेटर युवराज सिंगला विचारण्यात आले.
Yuvraj Singh said "Rohit Sharma is a great captain, he has won 5 IPL trophies, he took us into final, he is one of the great captains ever in IPL & India". [RevSportz] pic.twitter.com/3oa1f9VxEw
— Johns. (@CricCrazyJohns) January 13, 2024
'तसं असेल तर दोघांनी बोलावं'
युवराज म्हणाला की, 'जेव्हा खेळाडू एकत्र क्रिकेट खेळतात तेव्हा या सर्व गोष्टी घडतात. खेळाडूंच्या एकमेकांविरुद्ध काही तक्रारी असतील तर त्यांनी नक्की बसून चर्चा करावी. हार्दिक जेव्हा मुंबई इंडियन्सकडून खेळला तेव्हा रोहितने सर्वोत्तम कामगिरी केली. हार्दिकचा लोड पाहून रोहित त्याला अतिशय हुशारीने गोलंदाजी करायला लावायचा. बरं, मला काही प्रॉब्लेम दिसत नाही पण जर काही असेल तर आपण दोघांनी त्याबद्दल बोलायला हवं.
युवराज म्हणतो, 'जेव्हाही तुम्ही देशासाठी खेळता तेव्हा तुमचे प्राधान्य सर्व काही बाजूला ठेवून 100 टक्के द्यायचे असते. हे दोघेही व्यावसायिक आहेत. जर त्यांच्यात काही वाद असेल तर त्यांनी तो बाजूला ठेवावा आणि देशासाठी 100 टक्के द्यावे.
'रोहित भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक'
युवराजने रोहित शर्माचेही खूप कौतुक केले. तो म्हणाला की, 'मी म्हणू शकतो की रोहित एक अद्भुत कर्णधार आहे. त्याच्या खात्यात 5 आयपीएल ट्रॉफी आहेत. त्याने आम्हाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेले. तो आयपीएल आणि भारतातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे.
इतर महत्वाच्या बातम्या