Most ODI centuries in less than 100 balls : शंभर बाॅलच्या आता सर्वाधिक शतकांचा पराक्रम कोणाच्या नावावर? टाॅप 4 मध्ये तीन टीम इंडियाचे राॅकस्टार!
भारतासाठी विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत कोहली संयुक्त चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. कोहलीने 3 शतके झळकावली आहेत. शिखर धवननेही ३ शतके झळकावली आहेत.
Most ODI centuries in less than 100 balls : विश्वचषक 2023 च्या 17 व्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. पुण्यात झालेल्या सामन्यात विराट कोहलीने टीम इंडियासाठी रेकॉर्डब्रेक शतक झळकावले. त्याने 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 103 धावा केल्या. विश्वचषकात एका संघाविरुद्ध दोन किंवा अधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत कोहलीने सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरची बरोबरी साधली. यासह त्याने खास यादीतही स्थान मिळवले आहे.
Records broken by Virat Kohli today:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 19, 2023
- Leading run scorer in ICC White Ball events.
- Joint most POTM awards in ICC events.
- 4th highest all time run scorer.
- Fastest to 26,000 runs.
- 1st Indian with 1,000 WC runs at No.3.
- Most fifty plus scores while chasing in ICC events.… pic.twitter.com/A691tC5USb
विश्वचषकात एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत कोहलीने सचिन आणि गांगुली यांच्या बरोबरी साधली आहे. सचिनने केनियाविरुद्ध दोन शतके झळकावली आहेत. सौरव गांगुलीनेही केनियाविरुद्ध दोन शतके झळकावली आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी बांगलादेशविरुद्ध प्रत्येकी दोन शतके झळकावली आहेत.
विराट कोहलीचा असाही पराक्रम
एकदिवसीय सामन्यांमध्ये 100 चेंडूच्या आत सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रमही विराट कोहलीच्या नावावर जमा झाला आहे. दुसऱ्या क्रमांकवर एबी डिव्हिलियर्स, तिसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आणि चौथ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे.
Most ODI centuries in less than 100 balls (total centuries):
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 20, 2023
Virat Kohli - 33 (48).
AB De Villiers - 25 (25).
Sachin Tendulkar - 24 (49).
Rohit Sharma - 21 (31). pic.twitter.com/XK22wyCPrO
भारतासाठी विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत कोहली संयुक्त चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. कोहलीने 3 शतके झळकावली आहेत. शिखर धवननेही ३ शतके झळकावली आहेत. रोहित शर्मा या बाबतीत आघाडीवर आहे. त्याने 7 शतके झळकावली आहेत. सचिन तेंडुलकरने 6 शतके झळकावली आहेत. सौरव गांगुलीने 4 शतके झळकावली आहेत.
बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात कोहलीने आणखी एक विक्रम केला. एमसीए स्टेडियम, पुणे येथे त्याने 500 धावा पूर्ण केल्या. कोहलीने येथे 551 धावा केल्या आहेत. मीरपूर, ढाका येथे त्याने 800 धावा केल्या आहेत. कोहलीची ही कोणत्याही मैदानावरील वनडेतील सर्वोच्च धावसंख्या आहे. कोलंबोतील आरपीएस स्टेडियमवर त्याने 644 धावा केल्या आहेत.
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 विकेट गमावून 256 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 41.3 षटकांत 3 विकेट गमावून 261 धावा केल्या. कोहलीसोबतच शुभमन गिलनेही भारतासाठी चांगली कामगिरी केली. त्याने अर्धशतक झळकावले.
इतर महत्वाच्या बातम्या