एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चांगली कामगिरी करुनही मला संघाबाहेर ठेवलं होतं : रैना
'मी दु:खी झालो होतो कारण की, चांगली कामगिरी करुनही मला संघातून बाहेर ठेवण्यात आलं होतं. पण आता मी यो-यो टेस्ट पास केली आहे. त्यामुळे मी आता पूर्णपणे फिट आहे.'
नवी दिल्ली : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाने बऱ्याच कालावधीनंतर भारताच्या टी-20 संघात पुनरागमन केलं आहे. पण याचबाबत बोलताना त्याने मोठं वक्तव्य केलं. 'चांगली कामगिरी करुनही मला भारतीय संघातून बाहेर ठेवण्यात आलं होतं. ज्यामुळे मी खूप दुखावलो होतो.' असं रैना म्हणाला. पण आता मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी रैना सज्ज झाला आहे.
'आज तक'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत रैना म्हणाला की, 'मी दु:खी झालो होतो कारण की, चांगली कामगिरी करुनही मला संघातून बाहेर ठेवण्यात आलं होतं. पण आता मी यो-यो टेस्ट पास केली आहे. त्यामुळे मी आता पूर्णपणे फिट आहे. एवढ्या महिन्यांच्या कठोर ट्रेनिंगमुळे भारतासाठी खेळण्याची माझी इच्छा आणखी प्रबळ झाली आहे.'
'भारतासाठी जेवढे जास्तीत-जास्त दिवस खेळावं हाच माझा प्रयत्न असणार आहे. मला 2019चा विश्वचषक खेळायचा आहे. कारण मला माहिती आहे की, मी इंग्लंडमध्ये माझी कामगिरी चांगली होती. माझ्यामध्ये अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे. त्यामुळे मला आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन टी-20 मध्ये चांगली कामगिरी करायची आहे.' असंही रैना यावेळी म्हणाला.
31 वर्षीय रैनाने 223 वनडे, 65 टी-20 आणि 18 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement