एक्स्प्लोर
Advertisement
मी धोनीकडून बरंच काही शिकलो: विराट
मुंबई: भारतीय कसोटी संघाची धुरा सांभाळणाऱ्या विराट कोहलीची आजवरची कामगिरी अतिशय चांगली आहे. आक्रमकपणा कायम ठेऊन त्यांनं कसोटीत संघाला विजय मिळवून दिले आहेत.
कोहलीनं आजवर 16 कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यामध्ये त्याने 9 कसोटीत विजय मिळवला आहे. तर 2 कसोटीत त्याला पराभव स्वीकारावा लागला आहे. तर 5 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.
हा धडकेबाज कर्णधार स्वत: मात्र, महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाच्या प्रेमात आहे. त्यानं बीसीसीआय टीव्हीशी बोलताना सांगितलं की, 'अनेकदा निर्णय घेणं कठीण असतं. त्यासाठी तुमच्यात फार हिंमत असावी लागते. मी धोनीकडून फार काही शिकलो आहे. तुमचे निर्णय चूक असो अथवा बरोबर तुम्ही त्यावर ठाम राहणं गरजेचं आहे आणि हीच एका चांगल्या कर्णधाराची निशाणी असते.'
कोहली म्हणाला की, 'देशाच्या कसोटी संघाचा कर्णधार असणं ही फारच गौरवास्पद बाब आहे. कर्णधारपदाच्या जबाबदारीनं मला चांगला क्रिकेटर होण्यास मदत होत आहे. टेस्ट क्रिकेटसारखी परीक्षा दुसऱ्या कोणत्याच फॉर्मेटमध्ये नसते.'
'चढ-उतार हे येतच असतात. जेव्हा तुम्ही टीका आणि नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागेल त्यावेळी तुमची खरी परीक्षा असणार आहे.' असं विराट म्हणाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement