एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
क्रीजमध्ये पोहोचूनही रोहित शर्मा बाद का झाला?
रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन डेत ज्या पद्धतीने बाद झाला, ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. क्रीजमध्ये पोहोचूनही त्याला बाद देण्यात आलं. कारण त्याच्या हातातून बॅट निसटली होती.
दम्बुला : श्रीलंकेला कसोटी मालिकेत 3-0 ने धूळ चारल्यानंतर भारताने वन डे मालिकेचीही विजयाने सुरुवात केली. श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताला पहिला धक्का सुरुवातीलाच लागला. सलामीवीर रोहित शर्मा केवळ 4 धावा करुन माघारी परतला.
रोहित शर्मा ज्या पद्धतीने बाद झाला, ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. लसिथ मलिंगाच्या षटकात धाव घेताना रोहित शर्मा बाद झाला. धाव घेताना रोहत शर्मा क्रीजमध्ये पोहोचलाच होता. मात्र त्याच्या हातातून बॅट निसटली आणि त्याला बाद देण्यात आलं.
रोहत शर्माच्या हातातून बॅट निसटली, ज्यामुळे त्याला माघारी परतावं लागलं. रोहित शर्माच्या विकेटनंतर टीम इंडियाने दमदार फलंदाजी केली आणि सामना 9 विकेट्सने नावावर केला.
टीम इंडियाने दम्बुलाच्या पहिल्या वन डेत श्रीलंकेचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून, पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
या सामन्यात भारताच्या फिरकी गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव अवघ्या 216 धावांत गुंडाळून निम्मी कामगिरी फत्ते केली होती. मग शिखर धवन आणि विराट कोहलीनं दुसऱ्या विकेटसाठी 197 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
शिखर धवनने 90 चेंडूंत 20 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 132 धावांची खेळी उभारली. विराट कोहलीनं 70 चेंडूंत 10 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 82 धावांची खेळी केली.
पाहा व्हिडिओ :
https://twitter.com/84107010ghwj/status/899265793061421060
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement