एक्स्प्लोर
बॅडमिंटनमधील भारताची आशा अजूनही कायम
रिओ डि जिनेरिओ: रिओ ऑलिम्पिकमधील बॅडमिंटनच्या महिला एकेरीतील सायना नेहवालचं आव्हान संपुष्टात आलं असलं, तरी महिला एकेरीतील पी. व्ही. सिंधू आणि पुरुष एकेरीतील किदाम्बी श्रीकांत यांच्याकडूनही पदकाची अपेक्षा उंचावल्या आहेत.
रविवारी झालेल्या सामन्यात पीव्ही सिंधूने हंगेरीच्या लॉरा सारोसीवर सहज विजय मिळवत, दुसऱ्या ग्रुपमधील प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. सिंधूनं अवघ्या 27 मिनिटांत लॉराचा 21-8, 21-9 असा धुव्वा उडवला. आता 14 तारखेला आपल्या दुसऱ्या लढतीत सिंधूला कॅनडाच्या मिशेल लीचा मुकाबला करायचा आहे
तर दुसरीकडे पुरुष एकेरीतील सामन्यात किदाम्बी श्रीकांतने राउंड ऑफ-16 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहेत. श्रीकांतने ग्रुप-एचच्या साखळी सामन्यात स्वीडनच्या हेनरी हुरसकाईननला 21-6, 21-18 असे हारवून ऑफ-16मध्ये आपले स्थान बनवले.
सायना नेहवालचं महिला एकेरीतलं आव्हान संपुष्टात
.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
Advertisement