SAFF Championship 2023 : शानदार विजयासह भारताची अंतिम फेरीत धडक, टीम इंडियाचं नवव्या सॅफ चॅम्पियनशिपचं लक्ष्य
Indian Football Team : कर्णधार सुनील छेत्रीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने उपांत्य फेरीत लेबनान संघाचा 4-2 ने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.
![SAFF Championship 2023 : शानदार विजयासह भारताची अंतिम फेरीत धडक, टीम इंडियाचं नवव्या सॅफ चॅम्पियनशिपचं लक्ष्य india beat lebanon in saff championship ind vs leb Semi Final sunil chhetri here know latest sports news SAFF Championship 2023 : शानदार विजयासह भारताची अंतिम फेरीत धडक, टीम इंडियाचं नवव्या सॅफ चॅम्पियनशिपचं लक्ष्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/8344502f924834b42a7b5ef6bbb1e9321688261913839322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs LEB, SAFF Championship SF : भारतीय फुटबॉल संघाने (Team India) शानदार विजयासह सॅफ चॅम्पियनशिपच्या (SAFF Championship 2023) अंतिम फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात भारतीय संघाचं (Indian Football Team) दमदार प्रदर्शन पाहायला मिळालं. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने उपांत्य फेरीत लेबनॉनचा 4-2 असा पराभव केला. भारत-लेबनॉन सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआऊटमध्ये झाला. निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यानंतर सामना अतिरिक्त वेळेत खेळला गेला, पण अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यानंतर या सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला.
टीम इंडिया धमाकेदार विजय, अंतिम फेरीत धडक
सॅफ चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत भारतीय फुटबॉल संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये लेबनॉनचा दमदार पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली. निर्धारित 90 मिनिटांनंतर सामना 0-0 असा बरोबरीत संपल्यामुळे अतिरिक्त वेळेत खेळला गेला. अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये सामन्याचा निकाल लागला. टीम इंडियाच्या खेळाडूंनी येथे शानदार कामगिरी करत सामना जिंकला. आता भारतीय फुटबॉल संघाचा अंतिम सामना 4 जुलै रोजी कुवेत संघासोबत रंगणार आहे.
SAFF Championship 2023 | India beat Lebanon 4-2 in penalty shootout in the semi-final as the match ended 0-0 going into extra time. India to play Kuwait in final. pic.twitter.com/maKPbC4Qrq
— ANI (@ANI) July 1, 2023
सॅफ चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाची शानदार कामगिरी
टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. सॅफ चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाची शानदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. भारतीय संघाने पाकिस्तान आणि नेपाळचा पराभव केला होता. त्यानंतर कुवेतविरुद्धचा शेवटचा गट सामन्याचा निकाल 1-1 असा बरोबरीत लागला. यानंतर उपांत्य फेरीतही भारताने लेबनॉनचा पराभव करत विजयी कामगिरी कायम ठेवली आहे.
पेनल्टी शूटआउटमध्ये दोन्ही संघांची कामगिरी
भारत
- सुनील छेत्री - गोल
- अन्वर अली - गोल
- महेश सिंह - गोल
- उदांता सिंह - गोल
लेबनॉन
- हसन माटुक - गोल करता आला नाही
- वालिद - गोल
- मोहम्मद सादिक - गोल
- खली बादेर - गोल करता आला नाही
नवव्यांदा चॅम्पियन होणं भारताचं लक्ष्य
भारत तेराव्यांदा सॅफ चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. टीम इंडिया आठ वेळा सॅफ चॅम्पियन ठरला आहे. तर, चार वेळा उपविजेता ठरला आहे. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची नजर नवव्यांदा चॅम्पियन बनण्याकडे असेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)