Fifa World Cup 2022 : स्वित्झर्लंडचा कॅमेरॉनवर 1-0 ने विजय, तर उरुग्वे-दक्षिण कोरिया सामना अनिर्णीत
Fifa WC 2022 : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत सकाळपासून दोन सामने झाले असून यातील पहिल्या सामन्यात स्वित्झर्लंडनं कॅमेरॉनवर 1-0 ने विजय मिळवला, तर उरुग्वे-दक्षिण कोरिया सामन्यात एकही गोल झाला नाही.
![Fifa World Cup 2022 : स्वित्झर्लंडचा कॅमेरॉनवर 1-0 ने विजय, तर उरुग्वे-दक्षिण कोरिया सामना अनिर्णीत FIFA WC 2022 Qatar Uruguay draw against South Korea Switzerland won match 1-0 against Cameroon know fifa results Fifa World Cup 2022 : स्वित्झर्लंडचा कॅमेरॉनवर 1-0 ने विजय, तर उरुग्वे-दक्षिण कोरिया सामना अनिर्णीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/24/f01ac5d64ed0cb7d149b1b6818c0a1501669302124046323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Fifa World Cup 2022 : कतारमध्ये सुरु फिफा विश्वचषक स्पर्धेत (Fifa World Cup 2022) आज दिवसातील पहिले दोन सामने पार पडले आहेत. यामध्ये पहिल्या सामन्यात स्वित्झर्लंडनं कॅमेरॉनवर 1-0 ने विजय मिळवला (Switzerland vs Cameroon). तर उरुग्वे आणि दक्षिण कोरिया या अटीतटीच्या सामन्यात दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही, ज्यामुळे सामना अनिर्णीत सुटला.
आज दिवसातील पहिल्या सामन्याचा विचार करता फीफा रँकिंगमध्ये 14 व्या स्थानावर असणाऱ्या स्वित्झर्लंडने आपल्या रँकिंगला साजेशा खेळ कर 38 व्या स्थानावरील कॅमरॉनवर 1-0 ने विजय मिळवला. अर्थात कॅमेरॉन संघानेही कडवी झुंज दिली. सामन्यातील एकमेव गोल हा एम्बोलो याने केला. सामन्यात सुरुवातीपासून दोन्ही संघ अटीतटीचा खेळ दाखवत होते. 45 मिनिटं अर्थात निम्मा सामना झाला तरी दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही. पण हाल्फ टाईमनंतर दुसऱ्याच मिनिटाला संघाचा स्टार खेळाडू शकिरी याने एक उत्कृष्ट असा क्रॉस दिला, ज्यानंतर एम्बोलो यानेही कोणतीच चूकी न करता दमदार गोल केला. ज्यानंतर दोन्ही संघाना एकही गोल केला नाही, पण 1-0 च्या आघाडीमुळे स्वित्झर्लंडनं विजय मिळवला.
View this post on Instagram
दुसऱ्या सामन्यात दोनदा विश्वचषक विजेत्या उरुग्वे संघाला एकही गोल करता आला नाही. दक्षिण कोरियाने दमदार डिफेन्ससोबत आक्रमणं सुरु ठेवली आणि एका अटीतटीच्या सामन्यात अखेर दोन्ही संघाना एकही गोल करता न आल्याने 0-0 स्कोरमुळे सामना बरोबरीत सुटला.
View this post on Instagram
आजचे उर्वरीत सामने?
आता अजून दोन सामने फिफा विश्वचषकात आज होणार आहेत. या दोन्ही सामन्यात स्टार खेळाडू मैदानात उतरणार असून 9.30 वाजता पोर्तुगाल विरुद्ध घाना सामना होईल. ज्यामध्ये स्टार फुचबॉलर रोनाल्डो मैदानात येईल. त्यानंतर मध्यरात्री 12 वाजून 30 मिनिटांनी ब्राझील विरुद्ध सर्बिया सामना रंगणार आहे. ज्यामध्ये नेमारची टोळी मैदानात उतरेल.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)