(Source: ECI/ABP News/ABP Majha)
FIFA WC 2022 Qatar : मोरक्को विरुद्ध क्रोएशिया सामना अनिर्णीत, दोन्ही संघ गोल करण्यात अयशस्वी
Fifa WC 2022 : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज दिवसातील पहिला सामना मोरक्को आणि क्रोएशिया यांच्यात पार पडला असून अतिरिक्त वेळतही दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही.
Morocco vs Croatia : कतारमध्ये सुरु फिफा विश्वचषक स्पर्धेत (Fifa World Cup 2022) आज दिवसातील पहिला सामना मोरक्को आणि क्रोएशिया (Morocco vs Croatia) यांच्यात पार पडला. 90 मिनिटानंतर अतिरिक्त सहा मिनिटंही दोन्ही संघाना देण्यात आली पण दोघांनाही एकही गोल करता न आल्यानं सामना 0-0 असा बरोबरीत सुटला. ज्यामुळंं F ग्रुपमध्ये दोन्ही संघाना एक-एक गुण देण्यात आला आहे.
2018 विश्वचषकातील उपविजेता संघ क्रोएशिया फीफा रँकिंगमध्ये (Fifa Ranking) 12 व्या तर मोरक्को 22 व्या स्थानावर आहे, असं असूनही मोरक्कोनं अगदी दमदार खेळ दाखवत क्रोएशियाला एकही गोल करु दिला नाही. दोन्ही संघानी कमालीची झुंज दिली आणि अखेर सामना अनिर्णीत राहिला.
View this post on Instagram
विशेष म्हणजे क्रोएशियाचा संघ 2006 पासून तब्बल 12 सामन्यानंतर पहिल्यांदाच विश्वचषक सामन्यात एकही गोल करु शकलेला नाही. तर मोरक्को संघाने 17 पैकी 9 सामन्यात एकही गोल केलेला नाही. आजच्या सामन्याता विचार करता 45 व्या मिनिटाला Nikola Vlasic याने एक दमदार शॉट खेळला होता, पण तो गोल वाचवण्याच मोरक्को यशस्वी राहिला. आजच्या या सामन्यात मोरक्को संघाकडून Hakim Ziyech याने सर्वाधिक अटॅक मोरक्कोकडून केले. एकूण शॉट्सचा विचार करता मोरक्कोने 8 तर क्रिएशियाने 5 वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला. पण अखेर दोन्ही संघ एकही गोल करु शकले नाहीत.
हे देखील वाचा-