FIFA WC 2022: पोर्तुगालचा संघ पहिल्या विश्वचषक ट्रॉफीच्या शोधात; रोनाल्डोसह 'या' 26 खेळाडूंवर मोठी जबाबदारी
Portugal Football Team: यंदाच्या फिफा फुटबॉल विश्वचषकात (Football World Cup) ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) पोर्तुगाल संघाचं (Portugal Football Team) नेतृत्व करताना दिसणार आहे.
Portugal Football Team: यंदाच्या फिफा फुटबॉल विश्वचषकात (Football World Cup) ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) पोर्तुगाल संघाचं (Portugal Football Team) नेतृत्व करताना दिसणार आहे. पोर्तुगालचे व्यवस्थापक फर्नांडो सँटोस यांनी या 37 वर्षीय खेळाडूचा पोर्तुगालच्या 26 जणांच्या संघात समावेश केलाय. रोनाल्डोसोबतच त्याचा जुना जोडीदार 29 वर्षीय पेपे यालाही संघात स्थान मिळालं आहे.
आगामी फुटबॉल विश्वचषकातील पोर्तुगाल संघात अनेक स्टार खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय. जो फ्लिक्स, बर्नार्डो सिल्वा, ब्रुनो फर्नांडिस आणि जो कॉन्सेलो यांसारख्या मोठ्या खेळाडूंचा समावेश असलेल्या पोर्तुगाल संघ पहिल्या फिफा विश्वचषक ट्रॉफी ट्रॉफीच्या शोधात मैदानात उतरेल. पोर्तुगालनं अद्या एकदाही फिफा विश्वचषक जिंकलेला नाही. दरम्यान, पीएजी मिडफील्डर रेनेटो सांचेज, बोल्व्सचा फिडफील्डर जोऊ मॉन्टिन्हो आणि गोन्कालो गुडिज यांना या संघात जागा मिळाली नाही.
पोर्तुगालच्या ग्रुपमध्ये कोणकोणते संघ?
पोर्तुगाल फुटबॉल संघाला फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेच्या ग्रुप एचमध्ये ठेवण्यात आलंय. या ग्रुपमध्ये घाना, उरुग्वे आणि दक्षिण कोरिया यांसारख्या संघाचा समावेश आहे. पोर्तुगाल 24 नोव्हेंबरला या स्पर्धेतील त्यांचा पहिला सामना घाना विरुद्ध खेळेल. त्यानंतर 28 नोव्हेंबरला उरुग्वेशी या स्पर्धेतील दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. पोर्तुगाल गट फेरीतील अखेरचा सामना दक्षिण कोरियाशी खेळणार आहे. हा सामना 2 डिसेंबर रोजी खेळला जाईल. प्रत्येक ग्रुपमधील अव्वल दोन संघाला पुढच्या फेरीत प्रवेश मिळेल.
पोर्तुगाल फुटबॉल संघाचं वेळापत्रक
सामना | विरुद्ध संघ | तारीख |
पहिला सामना | घाना | 24 नोव्हेंबर 2022 |
दुसरा सामना | उरुग्वे | 28 नोव्हेंबर 2022 |
तिसरा सामना | दक्षिण कोरिया | 02 डिसेंबर 2022 |
पोर्तुगाल फुटबॉल संघ-
गोलकिपर: डिओगो कोस्टा, रुई पॅट्रिसिओ, जोसे सा.
डिफेंडर्स: डिओगो डालोट, जो कॉन्सुएलो, डॅनिलो परेरा, पेपे, रुबेन डायझ, अँटोनियो सिल्वा, नुनो मेंडेस, राफेल गुरेरो.
मिडफील्डर्स: रुबेन नेव्हस, जो फालिन्हा, विल्यम कार्व्हालो, ब्रुनो फर्नांडीझ, विटिन्हा, ओटोव्हियो, जो मारिओ, मॅथियास नेझ, बर्नार्डो सिल्वा.
फॉरवर्ड्स: राफेल लिओ, जो फिलिक्स, रिकार्डो होर्टा, गोंकालो रामोस, ख्रिस्तियानो रोनाल्डो, आंद्रे सिल्वा.
हे देखील वाचा-