FIFA Awards 2023 : मेस्सी ठरला सर्वोत्कृष्ट खेळाडू, पुटेलस सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू; पाहा फिफा पुरस्कारांची संपूर्ण यादी
FIFA Awards 2023 : फिफा पुरस्कार सोहळ्यात लिओनेल मेस्सी (Lionel Messi) हा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. तर ॲलेक्सिया पुटेलस सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ठरली आहे.
FIFA Awards 2023 : यंदा फिफा विश्वचषकात (FIFA World Cup) अर्जेंटिनाचा (Argentina) संघ विश्वविजेता ठरला. त्यानंतर आता फिफा पुरस्कार सोहळा (FIFA Awards 2023) पार पडला आहे. अर्जेंटिना (Argentina) संघाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) हा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. मेस्सीने फ्रान्सच्या (France) किलियन एमबाप्पेला (Kylian Mbappe) मागे टाकत या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. तसेच, स्पेनची ॲलेक्सिया पुटेलस (Alexia Putellas) सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ठरली आहे.
Best FIFA Men's Player Lionel Messi : मेस्सी ठरला हा सर्वोत्कृष्ट खेळाडू
डिसेंबर महिन्यामध्ये कतारमध्ये फिफा वर्ल्ड कप स्पर्धा रंगली. यामध्ये अर्जेंटिना संघाने पहिलं विश्वचषक जिंकलं. दरम्यान सोमवारी (27 फेब्रुवारी) फिफा पुरस्कार सोहळा पार पडला. यामध्ये लिओनेल मेस्सीला सर्वोत्तम खेळाडू या पुरस्काराने गौरवण्यात आलं. 35 वर्षीय मेस्सीने वर्ल्ड कप फायनलमध्ये दोन गोल केले होते.
What a night! 😍
— FIFA (@FIFAcom) February 27, 2023
Congratulations to all the winners at this year's #TheBest FIFA Football Awards 🏆
Find out who won in each category at the awards ceremony in Paris:
Best FIFA Women's Player : ॲलेक्सिया पुटेलस सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू
स्पेन संघाची ॲलेक्सिया पुटेलस (Alexia Putellas) सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू पुरस्काराची मानकरी ठरली आहे. ॲलेक्सिया सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ठरली आहे.
FIFA Awards 2023 : 'या' खेळाडूंनाही पुरस्कार
अर्जेंटिना संघाचा प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांचा (Lionel Scaloni) सर्वोत्तम प्रशिक्षक (FIFA Men’s Coach of the Year) म्हणून गौरव करण्यात आला आहे. अर्जेंटिना संघाचा कोच लिओनेल स्कालोनी यांनी डिसेंबरमध्ये संघाला विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळवून दिलं. त्यामुळे त्यांची फिफा सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली. महिला प्रशिक्षक पुरस्कार (FIFA Women’s Coach of the Year) सरिना विगमनला (Sarina Wiegman) देण्यात आला आहे. सरिना विगमनने महिला युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये (Women’s European Championship) इंग्लंडला विजेतेपद मिळवून दिलं. महिला गोलरक्षक पुरस्कार युरो विजेती इंग्लंडच्या मेरी इर्प्सला (Mary Earps) देण्यात आला आणि सर्वोत्तम पुरुष गोलकीपर अर्जेंटिना संघाच्या एमिलियानो मार्टिनेझ (Emiliano Martínez) ला देण्यात आला.
Winners of The Best FIFA Football Awards 2022 : सर्वोत्कृष्ट फिफा फुटबॉल पुरस्कार विजेते
- सर्वोत्तम फिफा पुरुष खेळाडू : लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना/पॅरिस सेंट-जर्मेन एफसी)
- सर्वोत्कृष्ट फिफा महिला खेळाडू : अॅलेक्सिया पुटेलास (स्पेन/एफसी बार्सिलोना फेमेनी)
- सर्वोत्तम फिफा महिला गोलकीपर : मेरी इर्प्स (इंग्लंड/मँचेस्टर युनायटेड डब्ल्यूएफसी)
- सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष गोलकीपर : एमिलियानो मार्टिनेझ (अर्जेंटिना/अॅस्टन व्हिला एफसी)
- सर्वोत्कृष्ट फिफा महिला प्रशिक्षक : सरिना विगमन (इंग्लंड महिला राष्ट्रीय संघ)
- सर्वोत्तम फिफा पुरुष प्रशिक्षक : लिओनेल स्कालोनी (अर्जेंटिना पुरुष राष्ट्रीय संघ)
- फिफा पुस्कास पुरस्कार : मार्सिन ओलेक्सी (पोलंड/वॉर्टा पॉझ्नान)
- फिफा फेअर प्ले अवॉर्ड : लुका लोचोशविली (जॉर्जिया/वोल्फ्सबर्गर एसी/यू.एस. क्रेमोनीज)
- फिफा फॅन अवॉर्ड : अर्जेंटिनियन चाहते