(Source: ECI/ABP News/ABP Majha)
FIFA Prize Money: फक्त विजेताच नाहीतर, विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांवरही FIFA कडून बक्षिसांची लूट; कोणाला मिळणार किती Prize Money?
FIFA World Cup 2022 Prize Money: फिफा विश्वचषकावर अर्जेंटिनानं नाव कोरलं, तर फ्रान्सचा संघ उपविजेता ठरला. पण तुम्हाला माहितीये का? या संघांना किती प्राईज मनी दिलं जाणार?
FIFA World Cup 2022 Prize Money: अर्जेंटिनाच्या लियोनेल मेस्सीचं (Lionel Messi) फिफा विश्वचषक (FIFA World Cup) जिंकण्याचं स्वप्न अखेर साकार झालं. कतारच्या (Qatar) लुसेल स्टेडियमवरच्या अंतिम सामन्यात मेसीच्या अर्जेंटिनानं (Argentina) फ्रान्सचा (France) पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव केला आणि फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. त्याआधी हा सामना जादा वेळेत 3-3 असा आणि निर्धारित वेळेत2-2 असा बरोबरीत सुटला होता.
फिफा विश्वचषकाच्या इतिहासात विजेतेपद पटकावण्याची अर्जेंटिनाची ही तिसरी वेळ ठरली. याआधी अर्जेंटिनानं 1978 आणि 1986 साली विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर तब्बल 36 वर्षांनी मेसीच्या अर्जेंटिनानं विश्वचषकावर पुन्हा आपलं नाव कोरलं आहे.
फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ मानला जातो. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष फिफा विश्वचषक 2022 कडे लागलं होतं. विश्वचषक ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला विजेतेपदासह कोट्यवधी रुपयांची प्राईज मनीही मिळते. फिफा विश्वचषकाची बक्षीस रक्कम खूप जास्त आहे आणि केवळ विजेता संघच नाही तर उपविजेता संघही मालामाल होतो. यासोबतच फिफामधील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांनाही एक ठरावीक रक्कम फिफाकडून दिली जाते.
कोणत्या संघाला किती प्राईज मनी?
- विजेती अर्जेंटीना : 347 कोटी रुपये
- उपविजेता फ्रांस : 248 कोटी रुपये
- तिसऱ्या क्रमांकावरील टीम : 223 कोटी रुपये (क्रोएशिया)
- चौथ्या क्रमांकावरील टीम : 206 कोटी रुपये (मोरक्को)
केवळ नॉकआउट सामन्यांत पोहोचणाऱ्या संघांनाच नाही तर विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनाही फिफाकडून काही रक्कम दिली जाते. कोणत्या संघांना किती रक्कम मिळाली, हे जाणून घेऊयात...
विश्वचषक स्पर्धेत सहभागी प्रत्येक संघाला 9-9 मिलियन डॉलर (दशलक्ष डॉलर्स)
- प्री-क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेल्या संघांसाठी 13 मिलियन डॉलर्सची बक्षीस रक्कम
- क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झालेल्या संघांसाठी 17 मिलियन डॉलर्स बक्षीस रक्कम
विश्वचषकादरम्यान फिफाकडून एकूण 3641 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही रक्कम सहभागी संघांना बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक संघाचा सहभाग, सामना जिंकणं, गोल शुल्क आणि विजेता संघ, उपविजेता संघ आणि बाद फेरीत पोहोचलेल्या संघांची रक्कम यांचा समावेश आहे.
फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात हेड-टू-हेड
एकूण सामने: 13
अर्जेंटिनाचा विजय : 7 वेळा
फ्रान्सचा विजय : 3 वेळा
ड्रॉ : 3 वेळा
अर्जेंटीना स्क्वॉड
गोलकीपर: एमिलियानो मार्टिनेज, गेरोनिमो रुल्ली, फ्रेंको अरमानी.
डिफेंडर: नहुएल मोलिना, गोंजालो मोंटिएल, क्रिस्टियन रोमेरो, जर्मन पेजेला, निकोलस ओटामेंडी, लिसेंड्रो मार्टिनेज, मार्कोस एक्यूना, निकोलस टैगेलियाफिको, जुआन फोयथ.
मिडफील्डर: रोड्रिगो डी पॉल, लिएंड्रो परेडेस, एलेक्सिस मॅकएलिस्टर, गुइडो रोड्रिग्ज, एलेजांद्रो गोमेज, एंजो फर्नांडीज, एक्सेक्विएल पलासियोस.
फॉरवर्ड: लियोनेल मेसी, एंजेल डि मारिया, लुटारो मार्टिनेज, जूलियन अल्वारेज, निकोलस गोंजालेज, जोकिन कोरिया, पाउलो डायबाला.
फ्रान्स स्क्वॉड
गोलकीपर: अलफोंसे एरिलो, ह्यूगो लॉरिस, स्टीव मनडाडा
डिफेंडर: लुकास हर्नांडेज, थियो हर्नांडेज, इब्राहिम कोनाते, जूल्स कोंदे, बेंजामिन पावर्ड, विलियम सालिबा, दायोत उपामेकानो, राफेल वराने
मिडफील्डर: एडुआर्डो कॅमाविंगा, यूसुफ फोफाना, मेटियो गुंदॉजी, एड्रियन रेबियट, ऑरेलियन टचॉमेनी, जोर्डन वेरेटॉट
फॉरवर्ड: करीम बेंजेमा, किंग्स्ली कोमेन, उस्माने डेम्बले, ओलिविर जिरूड, एंटोनी ग्रीजमॅन, कीलियन एम्बाप्पे, मार्कस थुरम, रँडल कोलो मुआनी
महत्त्वाच्या इतर बातम्या :