Chess Olympiad 2022 : आजपासून सुरु होणार बुद्धिबळ ऑलिम्पियाड; कुठे पाहाल सामने? कसं आहे वेळापत्रक?
FIDE Chess Olympiad 2022 : 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेला आजपासून चेन्नईमध्ये सुरुवात होत असून यंदा भारतीय बुद्धिबळपटूंकडून दमदार प्रदर्शनाची आशा केली जात आहे.
Chess Olympiad 2022 : बुद्धिबळ खेळातील मानाची स्पर्धा असणारी बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 (Chess Olympiad 2022) यंदा भारताच्या चेन्नई शहरात खेळवली जात आहे. मागील दोनही वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे ऑनलाईन पद्धतीने पार पडलेली ही स्पर्धा यंदा ऑफलाईन चेन्नईत पार पडत आहे. बुद्धिबळमधील अव्वल दर्जाचे संघ रशिया आणि चीन या स्पर्धेत नसताना भारताला अधिक विजय मिळवण्याची संधी आहे. यावेळी खुल्या आणि महिला गटात भारताचे अ, ब आणि क असे तीन संघ सामिल झाले आहेत. तर स्पर्धेला कधी सुरुवात होईल, कुठे सामने पाहता येतील आणि संघ कसे आहेत. सर्व पाहूया...
कधी होणार स्पर्धेला सुरुवात?
बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 चा ओपनिंग सिरेमनी गुरुवारी (28 जुलै) सायंकाळी झाल्यानंतर शुक्रवारी (29 जुलै) दुपारी 3.पासून सामन्यांना सुरुवात होईल.
कुठे पार पडणार सामने?
चेन्नई, तामिळनाडू येथील ईस्ट कोस्ट रोडवर असलेल्या शेरेटन महाबलीपुरम रिसॉर्ट आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे सामने खेळवले जातील.0
कुठे पाहता येणार?
बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण हे दूरदर्शनवर होणार असून Chessbase India and FIDE या युट्यूब चॅनेल्सवरही मोबाईलद्वारे तुम्ही सामने पाहू शकता.
कसं आहे वेळापत्रक?
दिनांक | राऊंड | वेळ |
29 जुलै | राऊंड 1 | दुपारी 3 |
30 जुलै | राऊंड 2 | दुपारी 3 |
31 जुलै | राऊंड 3 | दुपारी 3 |
1 ऑगस्ट | राऊंड 4 | दुपारी 3 |
2 ऑगस्ट | राऊंड 5 | दुपारी 3 |
3 ऑगस्ट | राऊंड 6 | दुपारी 3 |
4 ऑगस्ट | विश्रांती | - |
5 ऑगस्ट | राऊंड 7 | दुपारी 3 |
6 ऑगस्ट | राऊंड 8 | दुपारी 3 |
7 ऑगस्ट | राऊंड 9 | दुपारी 3 |
8 ऑगस्ट | राऊंड 10 | दुपारी 3 |
9 ऑगस्ट | राऊंड 11 | दुपारी 3 |
कसा आहे भारतीय संघ?
'अ' खुला गट | 'ब' खुला गट | 'क' खुला गट |
विदित गुजराथी | डी. गुकेश | सूर्यशेखर गांगुली |
पी. हरिकृष्ण | आर. प्रज्ञानंद | एस. पी. सेतुरामन |
अर्जुन इरिगसी | निहाल सरिन | अभिजित गुप्ता |
के. शशिकिरण | रौनक साधवानी | कार्तिकेयन मुरली |
एसएल नारायणन | बी. अधिबन | अभिमन्यू पुराणिक |
कसा आहे भारतीय संघ?
'अ' महिला गट | 'ब' महिला गट | 'क' महिला गट |
डी. हरिका | सौम्या स्वामीनाथन | इशा करवडे |
कोनेरू हम्पी | वांटिका अगरवाल | साहिथी वर्षिनी |
आर. वैशाली | मेरी अॅन गोम्स | पी. व्ही. नंधिधा |
भक्ती कुलकर्णी | पद्मिनी राऊत | प्रत्युशा बोड्डा |
तानिया सचदेव | दिव्या देशमुख. | विश्वा वस्नावाला |
हे देखील वाचा-
- Commonwealth Games 2022 : भारतीय महिला कॉमनवेल्थ सर करण्यासाठी सज्ज, कसं आहे वेळापत्रक, वाचा सविस्तर!
- Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा, हरमनप्रीत कर्णधार, तर मंधाना उपकर्णधार
- Commonwealth Games 2022 : भारतीय महिला कॉमनवेल्थमध्ये पदक मिळवण्यासाठी सज्ज, कर्णधार कौर म्हणाली...