Shubman Gill : 'सारा भाभी जैसी हो...', शुभमन गिलला पाहून चाहत्यांनी दिल्या घोषणा; विराट कोहलीने दिली मजेशीर प्रतिक्रिया
Shubman Gill : चाहते क्रिकेटच्या मैदानावर साराच्या नावाने शुभमन गिलला चिडवताना दिसले.
Shubman Gill : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचं (Sara Ali Khan) नाव गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर शुभमन गिलबरोबर (Shubman Gill) जोडलं जात आहे. सारा आणि शुभमन यांना अनेकदा एकत्र स्पॉटदेखील करण्यात आलं आहे. नुकताच आता एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये चाहते क्रिकेटच्या मैदानावर साराच्या नावाने शुभमन गिलला चिडवताना दिसत आहेत. अलीकडेच, इंदूरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध भारताच्या तिसर्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, प्रेक्षक साराच्या नावाने ओरडून शुभमनची छेड काढताना दिसले. यावेळी संपूर्ण स्टेडियममध्ये साराच्या नावाचा जयघोष सुरु होता.
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये प्रेक्षक साराच्या नावाने ओरडताना दिसत आहेत. ‘हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो' अशा घोषणा स्टेडियमवर दिल्या जात आहेत. व्हिडीओमध्ये शुभमन न्यूझीलंडविरुद्ध फिल्डींग करताना दिसत आहे. मात्र, या घोषणा सारा अली खानसाठी आहेत की सारा तेंडुलकरसाठी आहेत, याचा उल्लेख मात्र प्रेक्षकांनी केला नाही. मध्यंतरी शुभमन गिल सचिन तेंडुलकरच्या मुलीला डेट करत असल्याचीही चर्चा होती.
विराट कोहली एन्जॉय करताना दिसला
प्रेक्षकांनी शुभमनला चिडवल्यानंतर क्रिकेटर विराट कोहली एन्जॉय करताना दिसला. व्हिडीओमध्ये तो गर्दीकडे मागे वळून आनंदाने नाचताना दिसत आहे. तर, शुभमनने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. खरंतर, प्रेक्षक साराच्या नावाने ओरडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान लोक 'सारा सारा'च्या घोषणा देत होते.
Fans were cheering Shubman Gill by taking Sara's & Even Virat Kohli was enjoying!!!.... 😂😂🤣🤣#ViratKohli𓃵 | #ShubmanGillpic.twitter.com/tWvmdqpcA9
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) January 25, 2023
ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर चाहते सारा अली खान की सारा तेंडुलकर असा प्रश्न विचारताना दिसले. एका चाहत्याने लिहिले, "सारा ठीक आहे, पण अली खान की तेंडुलकर?" विराटची प्रतिक्रिया पाहून चाहतेही मजा घेताना दिसले.
आवडती अभिनेत्री कोण, शुभमन म्हणाला...
सारा अली खान आणि शुभमन अनेकदा डिनर आणि पार्टीमध्ये एकत्र स्पॉट झाले आहेत. गेल्या वर्षी एका शुभमनला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आले की, 'बॉलिवूडमधील तुझी सर्वात आवडती अभिनेत्री कोण आहे?; क्षणाचाही विलंब न करता शुभमनने लगेच साराचे नाव घेतले. पुढे त्याला प्रश्न विचारण्यात आला की, 'तू साराला डेट करतोय का?' या प्रश्नाचं उत्तर देत शुभमन म्हणाला, 'सारा का सारा सच बोल दिया. कदाचित हो कदाचित नाही.' शुभमनच्या या उत्तराने अनेकांचे लक्ष वेधले.