Shubman Gill : शुभमनला क्रिकेटच्या मैदानावर पाहताच चाहत्यांकडून साराच्या नावाच्या घोषणा; पण ही सारा कोण? नेटकऱ्यांना पडला प्रश्न
अभिनेत्री सारा आली खान (Sara Ali Khan) आणि क्रिकेटपटू शुभमन गिल (Shubman Gill) यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चे सुरु आहे.
Shubman Gill : क्रिकेटपटू आणि अभिनेत्रींच्या नात्याची चर्चा अनेक वेळा सोशल मीडियावर होत असते. काही अभिनेत्रींच्या क्रिकेटर्ससोबतच्या लव्ह स्टोरीज अनेकांना माहित असतील. शर्मिला टागोर तसेच अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या अभिनेत्रींनी क्रिकेटर्ससोबत लग्नगाठ बांधली. आता अभिनेत्री सारा आली खान (Sara Ali Khan) आणि क्रिकेटपटू शुभमन गिल (Shubman Gill) यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चे सुरु आहे. तसेच शुभमनचं नाव अनेक नेटकरी सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत (Sara Tendulkar) देखील जोडत आहेत. शुभमन हा नक्की कोणाला डेट करत आहे? असा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडत आहे. नुकताच एका क्रिकेट मॅचमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शुभमनला पाहिल्यानंतर त्याचे चाहते 'सारा, सारा' अशा घोषणा देत आहेत.
एका क्रिकेटमॅचमधील शुभमनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, क्रिकेटच्या मैदानात शुभमनला पाहताच त्याचे चाहते 'सारा, सारा' अशा घोषणा देतात. या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलंय, 'सारा तेंडुलकर की सारा अली खान?' या ट्वीटमध्ये शुभमनला टॅग देखील करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ
Sara Ali Khan or Sara Tendulkar? @ShubmanGill pic.twitter.com/7mjPNjI0ox
— Kumar Sourav (@AdamDhoni1) January 16, 2023
आवडती अभिनेत्री कोण, शुभमन म्हणाला...
सारा अली खान आणि शुभमन अनेकदा डिनर आणि पार्टीमध्ये एकत्र स्पॉट झाले आहेत. गेल्या वर्षी एका शुभमनला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आले की, 'बॉलिवूडमधील तुझी सर्वात आवडती अभिनेत्री कोण आहे?; क्षणाचाही विलंब न करता शुभमनने लगेच साराचे नाव घेतले. पुढे त्याला प्रश्न विचारण्यात आला की, 'तू साराला डेट करतोय का?' या प्रश्नाचं उत्तर देत शुभमन म्हणाला, 'सारा का सारा सच बोल दिया. कदाचित हो कदाचित नाही.' शुभमनच्या या उत्तराने अनेकांचे लक्ष वेधले.
सारा आणि शुभमन हे दोघे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. शुभमन हा क्रिकेटचा सराव करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. तर सारा ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. त्यांच्या नात्याबाबत जाणून घेण्यास त्यांचे चाहते उत्सुक आहेत.
साराचे आगामी चित्रपट
साराचा 'गॅसलाइट' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या आतरंगी रे, लव आज कल, सिम्बा, केदारनाथ या साराच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
शुभमनचं वादळी द्विशतक अन् नेटकऱ्यांकडून सारा तेंडुलकर ट्रोल, काहींनी तर एंगेजमेंटची घोषणाच केली!