एक्स्प्लोर
क्रिकेट खेळण्यापेक्षाही अॅक्टिंग कठीण: सचिन तेंडुलकर

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिनच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाचा टिझर लाँच, 'सचिन- अ बिलीअन ड्रीम्स' काल रिलीज करण्यात आला. त्यामुळे सचिनचा प्रवास पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर येणार आहे. क्रिकेटच्या मैदानात भल्याभल्या गोलंदाजांची भंबेरी उडवणाऱ्या सचिन तेंडुलकरची मात्र मोठ्या पडद्यावर एंट्री करताना बरीच दमछाक झाली. खुद्द सचिननंच याबाबत सांगितलं. जगातील वेगवान गोलंदाजांविरुद्ध धावा करण्यापेक्षाही कॅमेरा समोर काम करणं कठीणं आहे. असं सचिन म्हणाला. 'आजवर मी जे काम करायचो ते कॅमेरा शूट करायचं. पण आता मला अचानक सांगण्यात आलं की, तुम्ही हे (अभिनय) करा आणि ते शूट केलं जाईल. जे माझ्यासाठी फारच कठीण होतं.' असं सचिन म्हणाला. क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर अभिनयात पदार्पण करणारा सचिन म्हणतो की, 'क्रिकेट खेळण्यापेक्षा अभिनय करणं फारच कठीण आहे. मी याविषयी कधी विचारही केला नव्हता.' संबंधित बातम्या: VIDEO: सचिनच्या सिनेमाचा टिझर रिलीज सचिनवरील सिनेमाचं पोस्टर रिलीज, सोशल साईट्सवर धुमाकूळ
आणखी वाचा























