एक्स्प्लोर
तिसऱ्या कसोटीतून ब्रॉड आऊट, इंग्लंडला मोठा धक्का

नवी दिल्ली : विशाखापट्टणम कसोटीतल्या पराभवासोबतच इंग्लंडच्या संघाला आणखी एक धक्का बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला दुखापतीमुळे मोहालीतल्या तिसऱ्या कसोटीला मुकावं लागणार आहे. विशाखापट्टणम कसोटीदरम्यान ब्रॉडच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. त्यातून सावरण्यासाठी ब्रॉडला काही काळ सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच शनिवारपासून मोहालीत सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीला ब्रॉडला मुकावं लागणार आहे. ब्रॉडच्या पायाला दुखापत असूनही, त्याने विशाखापट्टणम कसोटीत फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती. त्याने दुसऱ्या डावात 33 धावांच्या मोबदल्यात भारताच्या चार फलंदाजांना माघारी धाडलं होतं. त्यामुळे ब्रॉड मोहालीत खेळू न शकल्यास, इंग्लंडच्या वेगवान माऱ्याची धार कमी होईल. दरम्यान, आपण मुंबईच्या चौथ्या कसोटीसाठी फिट होऊ, असा विश्वास स्टुअर्ट ब्रॉडने व्यक्त केला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम
भारत























