भारत-इंग्लंड यांच्यातील निर्णायक सामन्यात कोण मारणार बाजी?
भारत आणि इंग्लंड संघांमधला तिसरा आणि अखेरचा वन डे सामना आज लीड्समध्ये खेळवण्यात येत आहे. हा सामना जिंकून वन डे सामन्यांची सलग दहावी मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल.
![भारत-इंग्लंड यांच्यातील निर्णायक सामन्यात कोण मारणार बाजी? England tour- India vs england third one day match भारत-इंग्लंड यांच्यातील निर्णायक सामन्यात कोण मारणार बाजी?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/13084339/India-vs-England.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लंडन : भारत आणि इंग्लंड संघांमधला तिसरा आणि अखेरचा वन डे सामना आज लीड्समध्ये खेळवण्यात येत आहे. इंग्लंडनं लॉर्डसवरची दुसरी वन डे जिंकून, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे उभय संघांमधल्या वन डे सामन्यांच्या मालिकेत लीड्सचा सामना हा निर्णायक ठरेल. हा सामना जिंकून वन डे सामन्यांची सलग दहावी मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल.
भारताच्या मधल्या फळीनं दुसऱ्या वन डेत बजावलेली निराशानजक कामगिरी कर्णधार विराट कोहलीच्या दृष्टीनं चिंतेची बाब ठरणार आहे. भुवनेश्वर आणि बुमरा यांच्या अनुपस्थितीत भारताच्या मध्यमगती गोलंदाजांनी लॉर्डसवर बजावलेली कामगिरीही पराभवाला निमंत्रण देणारी ठरली होती.
तिसऱ्या निर्णायक सामन्यात भारताचा महत्त्वाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. भारताचा सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर यांनी सामन्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेच भुवनेश्वरच्या फिटनेस विषयी चिंता व्यक्त केली. 1 ऑगस्टपासून सुरु होत असलेल्या कसोटी मालिकेआधी भुवनेश्वर फिट होणे गरजेचं असल्याचे बांगर यांनी म्हटलं.
मात्र आजच्या सामन्यात भुवी खेळणार की नाही याबाबत संजय बांगर यांनी स्पष्ट काहीही सांगितलं नाही. इंग्लंड दौऱ्यात भुवनेश्वर कुमार आतापर्यंत केवळ दोन टी-20 सामन्यात खेळला आहे. कार्डिफ येथील टी-20 सामन्यात पाठिच्या दुखापतीमुळे भुवनेश्वर नंतरचे सामने खेळू शकला नाही.
भुवनेश्वर आणि बुमराहच्या अनुपस्थितीत उमेश यादव, सिद्धार्थ कौल आणि शार्दुल ठाकूर गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहे. मात्र डेथ ओव्हर्समध्ये या तिघांनाही आपली कमाल दाखवता आलेली नाही, हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)