एक्स्प्लोर
कर्णधार धोनीचा जिममध्ये कसून व्यायाम!
लखनौ: टीम इंडियाचा वनडे आणि टी 20 संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं सोमवारी लखनौमध्ये एका जीमचं उद्घाटन केलं. तसंच आपल्या चाहत्यांसोबत त्यानं सेल्फीही काढला.
धोनीनं आपली फ्रेंचाइजी स्पोर्ट्स फिट वर्ल्ड जिमचं उद्घाटन केलं आणि जवळजवळ 1 तास कसून व्यायामही केला. वर्कआऊटनंतर धोनीनं चाहते आणि जिमच्या स्टाफसोबत वेळ घालवला. त्यानंतर धोनी पुढे रवाना झाला.
कसोटीमधून निवृत्त झाल्यानं धोनी सध्या निवांत आहे. दरम्यान टीम इंडिया कसोटीसाठी वेस्ट इंडिजमध्ये आहे.
धोनीनं येथे लखनवी पदार्थांचाही चव चाखली. तसंच काही पदार्थ त्यानं सोबतही घेतलं. ज्यामध्ये धोनीचा जिगरी दोस्त आणि टीम इंडियातील खेळाडू सुरेश रैनाच्या नावानं तयार होणाऱ्या रैना कबाबचाही समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement