Maharashtra Live blog updates: अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांना घातपाताचा संशय, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
Maharashtra Live blog updates: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अजय महाराज बारस्कर यांच्यावर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आरोप करण्यासाठी 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप केला होता... सोबतच अजय बारस्कर यांच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत, त्यांनी 300 कोटींची संपत्ती जमा केलीये असे आरोप केले होते...या आरोपांनंतर अजय बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात 19 सप्टेंबर 2024 रोजी अहिल्यानगर न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती... मात्र, फिर्याद दाखल होऊनही मनोज जरांगे पाटील पोलिसांना सापडत नसल्याने अखेर अहिल्यानगर न्यायालयाने स्वतः स्पीड पोस्टाद्वारे जरांगे यांना नोटीस बजावली... या नोटीसमध्ये 10 फेब्रुवारी रोजी जरांगे यांना न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आले होते...मात्र ठरलेल्या तारखेला मनोज जरांगे पाटील न्यायालयात हजर राहिले नाहीत... यानंतर अजय महाराज बारस्कर यांनी तीव्र प्रतिक्रिया देत जरांगे यांनी न्यायालयात हजर राहून केलेले आरोप पुराव्यासह सिद्ध करावेत असे खुले आव्हान दिले आहे... न्यायालयात हजर राहून आरोप सिद्ध केले, तरच ते स्वतःला 96 कुळी क्षत्रिय मराठा म्हणवून घेण्यास पात्र आहेत असे अजय महाराज बारस्कर यांनी म्हटले आहे...दरम्यान जरांगे यांना 10 फेब्रुवारी ला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश असतांनाही ते हजर न राहिल्याने आता न्यायालयाकडून पुढील कारवाई केली जाऊ शकते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिक किन्नर समाजाचे गद्दीपती आणि किन्नर प्रतिष्ठानचे किन्नर पोलिस आयुक्तालयात
नाशिक ब्रेकिंग.
- नाशिक किन्नर समाजाचे गद्दीपती आणि किन्नर प्रतिष्ठानचे किन्नर पोलिस आयुक्तालयात
- नाशिक पोलिस उपायुकतांची घेतली भेट
- किन्नर जिहादचे आरोप करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात देण्यात आले निवेदन
- धर्मांतराचे आरोप करून समाजात तेड व खोट्या आरोप लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी
- गेल्या दोन दिवसांपूर्वी किन्नर समाजातील एका गटाने किन्नर समाजाच्या गद्दीपती सलमा नायक यांच्यावर केला होता किन्नर जिहादचा आरोप
- आरोप केल्यानंतर काढण्यात आला होता किन्नर समाज आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा
- मोर्चानंतर किन्नर समाजाकडून नाशिक पोलीस उपायुक्तांना कारवाई साठी देण्यात आले निवेदन
बाईट :-
१. हेमांगी सखी , प्रमुख किन्नर वैष्णव आखाडा
२.सलमा नायक, गादीपती
Z.P निवडणुकीत मोहोळ तालुक्यात भाजपला मिळालेल्या यशानंतर माजी आमदार राजन पाटील यांचा उमेश पाटलाना टोला
जिल्हापरिषद निवडणुकीत मोहोळ तालुक्यात भाजपला मिळालेल्या यशानंतर माजी आमदार राजन पाटील यांचा उमेश पाटलाना टोला
‘उमेश पाटील शब्दाचे पक्के असतील आणि सन्यास घेणार असतील तर त्यांनी सौंदत्तीला जावं’
‘मोहोळ तालुक्यात भाजपला मिळालेलं यश जे नरेंद्र मोदी, फडणवीस आणि जयकुमार गोरे यांच्या विचारावर विश्वास ठेवून जनतेने दिलं’
‘उमेश पाटील यांनी आता तरी त्यांनी शहाण व्हावं, मोहोळ तालुका सुसंस्कृत तालुका आहे’
‘खोटी आश्वासन देणे, टीका टिपन्नी करणे मान्य नाही, हे जनतेने दिलेला संदेश आहे’
‘उमेश पाटील हे शब्दाचे पक्के असतील आणि सन्यास घेणार असतील तर मोहोळचे महंमद आहेत’
‘त्या महंमदाकडून ड्रेस देतो, ते ड्रेस घेऊन त्यांनी सौंदत्तीला जावं, हा मी त्यांना सल्ला देतो’
असा टोला माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना लागवला
























