एक्स्प्लोर

Mumbai Pune Expressway: प्रोपिलीन टँकरबाहेरील बर्फाला ड्रायव्हरने स्पर्श केला, दोन्ही हात भाजले, पेरुच्या झाडापासून बनलेल्या खुट्टीने हजारो प्रवाशांचा जीव वाचला

Mumbai Pune Expressway traffic jam: मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर प्रवाशी तब्बल 32 तास अडकून पडले होते. यावरुन सरकावर बरीच टीका झाली होती. मात्र, याठिकाणी प्रत्यक्षात किती जोखीम होती, हे आता समोर आले

Mumbai Pune Expressway traffic jam: काही दिवसांपूर्वी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे तब्बल 32 तास प्रवाशांचा खोळंबा झाला होता. या घटनेची चांगलीच चर्चा रंगली होती. यावरुन सरकार आणि प्रशासनावरही अनेकांनी यथेच्छ टीका केली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन वायूचा टँकर (Propylene Gas Tanker) उलटल्यामुळे अपघात झाला होता. या टँकरमधून वायूगळती सुरु झाल्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील (Mumbai Pune Expressway) वाहतूक थांबवण्यात आली होती. पुढील अनेक तास या टँकरमधील वायू दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यात आला. हे काम अनेक तास सुरु असल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती. यावरुन बरीच टीका होत असली तरी ही दुर्घटना आणखी किती भीषण असू शकली असती आणि पेरुच्या झाडाच्या लाकडापासून (guava tree wood) बनवलेल्या एका खुट्टीमुळे पुढचा अनर्थ कसा टळला, याची माहिती आता समोर आली आहे. 

मुंबई-पुणे महामार्गावर टँकर अपघातानंतर प्रोपोलिन वायूगळती होत असताना एका “पेरू”च्या झाडापासून बनवलेल्या खुट्टीने हजारो प्रवाशांचा जीव वाचवला. उच्च दाबाखाली द्रवरूपात वाहणारा प्रोपिलीन दाब कमी होताच वेगाने बाहेर पडतो आणि तापमान –20 ते –23 अंशांपर्यंत घसरते. त्यामुळे वायू गळतीच्या ठिकाणी बर्फ साचतो. हा बर्फ हाताला लागला तर जणू आग लागल्यासारखी जखम होते. अपघातानंतर टँकर चालकाने हाताने ही वायू गळती रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याचे दोन्ही हात भाजून निघाले, मदतकार्यातील एक चुकीचा निर्णय अनेकांच्या जीवावर बेतला असता

जर टँकरमधील प्रोपोलिन वायू ज्वलनशील गोष्टींच्या संपर्कात आला असता, मोठा स्फोट झाला असता. या स्फोटांमुळे आसपास परिसरातील 10 किलोमीटरपर्यंत नुकसान झाले असते. दुर्दैवाने जर का तसे झाले असते, तर तो घाट परिसर राहिलाच नसता. कारण त्या टँकरमध्ये 22 टन प्रोपोलिन वायू नेहाला जात होता. हा वायू इतका घातक होता की, त्याचा वास येत नाही, मात्र कालांतराने तो शरीरात भिनला की श्वास रोखतो आणि ज्वलनशील गोष्टींच्या संपर्कात आल्यास पेट घेतो.

Mumbai Pune Expressway Accident: टँकरमधील वायूगळती रोखण्यासाठी पेरुच्या झाडापासून बनवलेली खुट्टी का वापरली?

महामार्गावरील वाहने ही अपघातक्षेत्रापासून दोन्ही बाजूने 1 किलोमीटर परिसरआधीच थांबवली होती. लोकांना वाहतूक कोंडींचा त्रास झाला मात्र, मदतकार्यादरम्यान एक चुकीचे पाऊल हजारोंचा बळी गेला असता. अपघातात टॅकरचा मेन व्हॉल्व तुटल्याने ही वायू गळती वेगाने होऊ लागली.  ही वायू गळती रोखण्यासाठी तज्ञांनी पेरूच्या झाडाची खुट्टी बनवून ती गळती नियंत्रणात आणली. ३६ तास हे ऑपरेशन सुरु होते. ही वायू गळती रोखण्यासाठी पेरूच्या झाडाचीच खुट्टी का बनवण्यात आली कारण, पेरूचे लाकूड मऊ व लवचिक असल्याने थंडीत फुगते आणि घट्ट घुसल्याने ती फुगते, अगदी वाईनच्या बाटलीवर ज्या पद्धतीने लाकडाचे सील लावतात त्याप्रमाणेच पेरुच्या झाडाच्या लाकडापासून बनवलेल्या खुट्टीने काम केले.

विशेष म्हणजे हा अपघात ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणाहून काही अंतरावरून पेट्रोल कंपन्यांच्याही लाईन गेल्या होत्या. वाहतूक कोंडी सुरळीत ठेवण्यासाठी टँकर हलवण्यासाठी टॅकरमधील वायूचे वजन कमी करणे आवश्यक होते. तीन टप्प्यांत गॅस ट्रान्सफर करण्यात आला आणि मोठी दुर्घटना रोखण्यात यश आले. या अपघातामुळे  “32 तासांची वाहतूक कोंडी”ची चर्चा रंगली खरी, मात्र, या 32 तासात मदतकार्यातील प्रत्येक जण जीव धोक्यात घालून काम करत होता.

आणखी वाचा

एका टँकरने मुंबई-पुण्याचा संपर्कच तोडून टाकला, 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर नेमकं काय घडलं?

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget