(Source: ECI/ABP News/ABP Majha)
DCW vs MIW : दोन्ही टेबल टॉपर्स एकमेंकाविरुद्ध भिडणार, मुंबईचा सामना दिल्लीशी, वाचा सविस्तर
MI-W vs DC-W, Match Preview : पहिले दोन्ही सामने जिंकून महिला आयपीएलच्या गुणतालिकेत टॉपवर असणारे मुंबई आणि दिल्ली हे संघ एकमेंकाविरुद्ध आज मैदानात उतरणार आहेत.
WPL 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेत आज (9 मार्च) एक दमदार सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळणार आहे. कारण मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) या तगड्या संघांमध्ये होणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संघांनीा आपआपले पहिले दोन्ही सामने जिंकल्याने दोघेही गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. दरम्यान महिलांच्या आयपीएल 2023 मधील आजचा हा सामना नवी मुंबईच्या डीवाय पाटील मैदानात होणार आहे.
मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने आतापर्यंत संघासाठी जबरदस्त खेळ करत नेत्त्वही उत्तम केलं आहे. ज्यामुळे पहिल्या सामन्यात गुजरातला 143 धावांनी मात दिल्यावर मुंबईने दुसऱ्या सामन्यात आरसीबीला 9 विकेट्सनी मात दिली. दुसरीकडे दिल्ली संघाने पहिल्या सामन्यात आरसीबीला 60 धावांनी पराभूत करत दुसऱ्या सामन्यात युपी संघाला 42 धावांनी पछाडलं आहे. आता दोघेही गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. दोघांनी दोन-दोन सामने जिंकले असले तरी मुंबईचा नेटरनरेट +5.185 तर आरसीबीचा नेटरनरेट +2.550 इतका असल्याने मुंबई एक नंबरला तर बंगळुरु दोन नंबरवर आहे.
कसे असू शकतात दोन्ही संघ?
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य अंतिम 11 : मेग लेनिंग (कर्णधार), शेफाली वर्मा, मारिझान कॅप, जेमिमाह रॉड्रिग्स, अॅलिस कॅप्सी/लॉरा हॅरिस, जेस जोनासेन, तानिया भाटिया (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी/तिटास साधू, शिखा पांडे, राधा यादव, तारा नॉरिस
मुंबई इंडियन्सची संभाव्य अंतिम 11 : हेली मॅथ्यू, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार),अमेलिया केर/क्लो ट्रायॉन, पूजा वस्त्राकर, इस्सी वाँग, हुमैरा काझ
कधी, कुठे पाहाल सामना?
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या महिला संघांमधील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 7 वाजता टॉस होईल. हा सामना नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स हे संघ स्पर्धेत सहभागी होत असून सर्व सामने मुंबईच्या दोन स्टेडियममध्ये खेळवले जातील. डीवाय पाटील स्टेडियमवर 11 सामने आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर 11 सामने होणार आहेत.
हे देखील वाचा-