एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वॉर्नर कधीही कर्णधार होणार नाही, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा निर्णय
बॉल टॅम्परिंग प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नरवर अधिक कडक कारवाई केली आहे.
मेलबर्न : बॉल टेम्परिंगमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. याचसोबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने असंही स्पष्ट केलं आहे की, जेव्हा स्मिथ संघात परत येईल त्यानंतरही एक वर्ष त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपावली जाणार नाही.
दुसरीकडे या प्रकरणात डेव्हिड वॉर्नरवर अधिक कडक कारवाई करण्यात आली आहे. वॉर्नर भविष्यात कधीही संघाचा कर्णधार होऊ शकणार नाही. वॉर्नरकडे कसोटी संघाचं उपकर्णधारपद आणि टी-20चं कर्णधार पद होतं. पण आता यापुढे तो कधीही कर्णधार होऊ शकणार नसल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केलं आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चौकशीनंतर स्पष्ट केलं की, बॉल टेम्परिंगसाठी सॅण्ड पेपरचा वापर करण्यात आला होता. ज्यामध्ये वॉर्नरची भूमिका फारच महत्त्वाची होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या स्पष्टीकरणात असं म्हटलं आहे की, वॉर्नर हा बॉल टॅम्परिंगचा मास्टरमाईंड आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर बंदी आल्यानंतर आयपीएलमधूनही या दोन्ही खेळाडूंची हकालपट्टी करण्यात आली आहे. स्मिथ राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता तर वॉर्नर हा सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार होता.
संबंधित बातम्या :
स्मिथ आणि वॉर्नरवरील बंदी योग्यच : सचिन तेंडुलकर
स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी
समालोचकाच्या चाणाक्ष नजरेमुळे बॉल टॅम्परिंगची घटना उघड!
VIDEO : स्टीव्ह स्मिथवर आजीवन बंदी घाला : संदीप पाटील
व्हॅसलिन ते बॉल टॅम्परिंग, क्रिकेटमधील बदमाशीचा इतिहास
चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेऱ्यात कैद
तोंडं पाहून न्याय का? हरभजनचा आयसीसीला खडा सवाल
स्मिथ आणि वॉर्नरचं आधीच ठरलं होतं, बॉल टेम्पर करायचा!
'या' पठ्ठ्याने बॉल टेम्परिंग प्रकरण समोर आणलं
क्रिकेट विश्वातील बॉल टेम्परिंगच्या पाच घटना
स्टीव्ह आणि कॅमेरुनवर अखेर आयसीसीकडूनही कारवाई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement