एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

दत्तू भोकनळच्या ठायी ‘जय जवान, जय किसान’चा साक्षात्कार

आजकालच्या जमान्यात यश आणि प्रसिद्धी अगदी सर्वसामान्य माणसालाही सेलिब्रिटी बनवते. मग लोकप्रियतेची हवा डोक्यात गेली की, माणसं आपलं मूळही सहज विसरून जातात. पण भारताचा आंतरराष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळ या नियमाला अपवाद ठरला आहे. लष्कराच्या सेवेतून आणि रोईंगच्या सरावातून सुट्टी मिळाल्यावर, नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातल्या आपल्या तळेगाव राही गावी आलेल्या दत्तू भोकनळनं आपली नाळ अजूनही मातीशी जुळलेली असल्याचं दाखवून दिलं आहे.

नाशिक | जकार्ता एशियाडमध्ये भारताला क्वाड्रुपल स्कल्सचं सांघिक सुवर्णपदक मिळवून देणारा शिलेदार ही ओळख आहे भारताचा रोईंगपटू दत्तू भोकनळची. हाच दत्तू भोकनळ आणि त्याचे सहकारी जकार्ता एशियाड गाजवून मुंबई विमानतळावर दाखल झाले, त्या वेळी सेनादलाच्या जवानांनी त्या रोईंग चमूचं वीरोचित स्वागत केलं होतं. दत्तू भोकनळ आणि रोईंग चमूचं सेनादलाकडून स्वागत होण्याचं कारण रोईंगचा अख्खा संघ हा सेनादलाच्या सेवेत आहे. दस्तुरखुद्द दत्तू हा तर खडकीच्या बॉम्बे इंजिनीयरिंग ग्रुपचा जवान आहे. सेनादलाचा एक जवान म्हणून देशाच्या सीमेचं रक्षण आणि देशासाठी एशियाड-ऑलिम्पिक गाजवणं असं दुहेरी कर्तव्य तो मोठ्या निष्ठेनं बजावतो. दत्तू भोकनळला लष्करातल्या याच कारकीर्दीनं आज आंतरराष्ट्रीय रोईंगपटू म्हणून देशात नवी ओळख मिळवून दिली आहे. पण दत्तूचं वैशिष्ट्य म्हणजे आपली नाळ ही काळ्या आईशी जुळलेली आहे, हे तो आजही विसरलेला नाही. दत्तू हा मूळचा नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातल्या तळेगावचा. लष्कराच्या सेवेतून आणि रोईंगच्या सरावातूनही छोटीशी सुट्टी मिळालेला दत्तू नुकताच कुठं गावी परतला आहे. खरं तर ही संधी त्याच्यासाठी भरपूर विश्रांती घेण्याची आहे. पण विश्रांती घेतोतो दत्तू कसला? गावी परतलेल्या दत्तूला तिथल्या दुष्काळी परिस्थितीनं पहिला धक्का दिला. शेतातला वाळलेला मका पाहून त्याची आणखी निराशा झाली. त्यानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आपली सारी प्रतिष्ठा बाजूला ठेवली आणि  मक्याच्या सोंगणीसाठी त्यानंही कंबर कसली. त्याविषयी दस्तुरखुद्द दत्तू भोकनळशी बातचीत केली असता, तो म्हणाला की, ज्या मातीत मी घडलो त्या मातीशी माझी नाळ अजूनही कायम आहे. त्यामुळं मातीत काम करताना मला कसलीही लाज वाटत नाही. सुट्टीसाठी घरी आलो, त्यावेळी घरची सारी मंडळीशेतात मका सोंगणीचं काम करत होती, मीही त्यांच्या कामाला हातभार लावला. वास्तविक दत्तू भोकनळसाठी शेतात राबणं हे काही नवं नाही. लष्करात दाखल होण्याआधी तो शेतात मेहनत करूनच लहानाचा मोठा झाला. पण कर्तृत्वानं मोठा झाल्यावरही तो पुन्हा शेतीसाठी काबाडकष्ट करतो, याचा भोकनळ कुटुंबियांना अभिमान आहे. दत्तूचे मामा भाऊसाहेब मत्सगर म्हणाले की, दत्तूचा आम्हाला अभिमान आहे. तो लहानपणापासूनच मोलमजुरी करत होता. त्याचे आईवडिलही लवकर वारले. तो स्वत:च्या मेहनतीनं आज खूप मोठा झाला आहे. तरी घरी आल्यावर शेतात कामं करतो. गावातल्यासारखा राहतो. प्रत्येकाशी आपुलकीनं बोलतो. त्याला कसलाही गर्व नाही. दत्तूच्या वहिनी धनश्री भोकनळ यांनाही आपल्या दीराचा अभिमान वाटतो. धनश्रीताई म्हणाल्या की, दत्तू घरी आले त्या वेळी आम्ही मका सोंगण्याचं काम करत होतो. ते म्हणाले की मलाही मका सोंगायचं काम करायचंय. आम्ही नको म्हटलं तरीही त्यांनी शेतात येऊन काम केलं. ते अजूनही आपल्या मातीला विसरले नाहीत याचा आम्हाला अभिमान आहे. भारताचे माजी पंतप्रधान लालबदाहूर शास्त्री यांनी १९६५ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात देशवासियांना जय जवान जय किसान हा नारा दिला होता. देशाच्या सीमेचं रक्षण करणारा जवान आणि देशवासियांचं पोट भरणारा किसान यांची आठवण जागवणारा तो नारा आजही राष्ट्रभावनेचा सर्वोच्चबिंदू आहे. दत्तू भोकनळच्या पाठीवर शाबासकीची थाप ठोकताना आपण एकसूरात म्हणूया... जय जवान, जय किसान!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Embed widget