CWG Live Updates Day 5: क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, टेनिसपासून सर्वकाही; कॉमनवेल्थ स्पर्धेतील प्रत्येक अपडेट्स
CWG 2022 Day 5 India Schedule: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रिडा 2022 स्पर्धेतील (Birmingham 2022 Commonwealth Games) आजचा दिवस भारतीय खेळाडूंसाठी महत्वाचा आहे.
LIVE
Background
CWG 2022 Day 5 India Schedule: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रिडा 2022 स्पर्धेतील (Birmingham 2022 Commonwealth Games) आजचा दिवस भारतीय खेळाडूंसाठी महत्वाचा आहे. राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेच्या पाचव्या म्हणजेच आज भारताचे ट्रक आणि फिल्ड खेळाडू आपल्या मोहिमेला सुरुवात करतील. त्याचबरोबर भारत 24 तासांत तीन सांघिक सुवर्णपदके मिळवण्याचा प्रयत्न करेल.
भारतीय लॉन्स बॉल्स संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी
लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया आणि रूपा तिर्की या चार सदस्यीय महिला लॉन बॉल्स संघानं त्यांच्या पहिल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवून इतिहास रचला आहे. हा संघ सुवर्णपदकासाठी दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.
सुवर्णपदकासाठी भारतीय मिश्र बॅडमिंटन संघ मैदानात उतरणार
याशिवाय, भारतीय मिश्र बॅडमिंटन संघ एनईसीमध्ये खडतर मलेशियन संघाविरुद्ध आपलं विजेतेपद राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल. पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांत सारखे खेळाडू एकेरी आणि दुहेरीच्या मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वी संघाला सुवर्णपदक जिंकताना पाहण्यासाठी खूप उत्सुक असतील.
पुरुष टेबल टेनिस संघ सुवर्णपदकासाठी सिंगापूरशी लढणार
पुरुषांच्या टेबल टेनिस संघानेही उपांत्य फेरीत नायजेरियाचा पराभव करून बाहेरचा रस्ता दाखवला. आता मंगळवारी या संघाची सुवर्णपदकासाठी सिंगापूरशी लढत होणार आहे.
सीमा पुनिया सलग पाचवे राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेतील पदक जिंकण्याचा प्रयत्न
ऍथलेटिक्समध्ये, महिला डिस्कस थ्रोअर सीमा पुनिया सलग पाचवे राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेतील पदक जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसेल. या वेळी एक कांस्य आणि चार रौप्य पदकांसह 39 वर्षीय सुवर्णपदक जिंकण्यासाठी उत्सुक असेल.
हे देखील वाचा-
- CWG 2022 Medal Tally: कॉमनवेल्थ पदकतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या तर, इंग्लंड दुसऱ्या स्थानावर; भारताचा क्रमांक कितवा?
- CWG 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची आतापर्यंत 9 पदकांची कमाई, पाहा विजेत्या खेळाडूंची यादी
- CWG 2022 Day 5 Schedule: बॅडमिंटन, टेबल टेनिसमध्ये भारतीय खेळाडू आज सुवर्णपदकासाठी लढणार; कसं असेल आजचं संपूर्ण वेळापत्रक?
CWG 2022 Live : डिस्कस थ्रोमध्ये भारत अपयशी
डिस्कस थ्रोमध्ये भारतीय महिला पदक जिंकू शकल्या नाहीत. सीमा पुनिया आणि नवजीत कौर यांनी अनुक्रमे पाचवं आणि आठवं स्थान मिळवलं.
CWG 2022 Live : टेबल टेनिसमध्ये भारताला सुवर्णपदक
कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताने पाचवं सुवर्णपदक आपल्या नावे केलं आहे. हे पदक भारताने टेबल टेनिस खेळाच्या पुरुष टीमच्या स्पर्धेत निश्चित केलं आहे. भारतीय टेबल टेनिस पुरुष संघाने अंतिम सामन्यात सिंगापूरला (India vs Singapore) मात देत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. अटीतटीच्या सामन्यात भारताने 3-1 च्या फरकाने सिंगापूरवर विजय मिळवला.
CWG 2022 Live: भारत विरुद्ध इंग्लंड हॉकी सामन्यात टीम इंडिया पराभूत
भारतीय महिला संघ आणि इंग्लंडमध्ये पार पडलेल्या हॉकी सामन्यात भारतीय महिला 3-1 ने पराभूत झाल्या आहेत.
CWG 2022 Live: पंतप्रधानांकडून लॉन बॉल्सपदक विजेत्या महिलांचं अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन बॉल्समध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय महिलांच्या ग्रुपचं अभिनंदन करत तुमची ही कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी असेल असंही म्हटलं आहे.
Historic win in Birmingham! India is proud of Lovely Choubey, Pinki Singh, Nayanmoni Saikia and Rupa Rani Tirkey for bringing home the prestigious Gold in Lawn Bowls. The team has demonstrated great dexterity and their success will motivate many Indians towards Lawn Bowls. pic.twitter.com/RvuoGqpQET
— Narendra Modi (@narendramodi) August 2, 2022
CWG 2022 Live: भारत- सिंगापूर पुरुष सांघिक स्पर्धेत स्कोर 1-1
कॉमनवेल्थ टेबल टेनिसच्या पुरुष सांघिक स्पर्धेत भारत आणि सिंगापूर यांच्यात सामना सुरू आहे. भारतानं हा सामना जिंकला तर सुवर्णपदक आपल्या नावावर करु शकणार आहे. सध्या दोन्ही संघानी एक-एक सामना जिंकल्याने स्कोर 1-1 असा आहे.