CWG 2022 Day 5 Schedule: बॅडमिंटन, टेबल टेनिसमध्ये भारतीय खेळाडू आज सुवर्णपदकासाठी लढणार; कसं असेल आजचं संपूर्ण वेळापत्रक?
CWG 2022 Day 5 India Schedule: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रिडा 2022 स्पर्धेतील (Birmingham 2022 Commonwealth Games) आजचा दिवस भारतीय खेळाडूंसाठी महत्वाचा आहे.
CWG 2022 Day 5 India Schedule: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रिडा 2022 स्पर्धेतील (Birmingham 2022 Commonwealth Games) आजचा दिवस भारतीय खेळाडूंसाठी महत्वाचा आहे. राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेच्या पाचव्या म्हणजेच आज भारताचे ट्रक आणि फिल्ड खेळाडू आपल्या मोहिमेला सुरुवात करतील. त्याचबरोबर भारत 24 तासांत तीन सांघिक सुवर्णपदके मिळवण्याचा प्रयत्न करेल.
भारतीय लॉन्स बॉल्स संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी
लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया आणि रूपा तिर्की या चार सदस्यीय महिला लॉन बॉल्स संघानं त्यांच्या पहिल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवून इतिहास रचला आहे. हा संघ सुवर्णपदकासाठी दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.
सुवर्णपदकासाठी भारतीय मिश्र बॅडमिंटन संघ मैदानात उतरणार
याशिवाय, भारतीय मिश्र बॅडमिंटन संघ एनईसीमध्ये खडतर मलेशियन संघाविरुद्ध आपलं विजेतेपद राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल. पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांत सारखे खेळाडू एकेरी आणि दुहेरीच्या मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वी संघाला सुवर्णपदक जिंकताना पाहण्यासाठी खूप उत्सुक असतील.
पुरुष टेबल टेनिस संघ सुवर्णपदकासाठी सिंगापूरशी लढणार
पुरुषांच्या टेबल टेनिस संघानेही उपांत्य फेरीत नायजेरियाचा पराभव करून बाहेरचा रस्ता दाखवला. आता मंगळवारी या संघाची सुवर्णपदकासाठी सिंगापूरशी लढत होणार आहे.
सीमा पुनिया सलग पाचवे राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेतील पदक जिंकण्याचा प्रयत्न
ऍथलेटिक्समध्ये, महिला डिस्कस थ्रोअर सीमा पुनिया सलग पाचवे राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेतील पदक जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसेल. या वेळी एक कांस्य आणि चार रौप्य पदकांसह 39 वर्षीय सुवर्णपदक जिंकण्यासाठी उत्सुक असेल.
भारतीय महिला हॉकी संघाचा आज सामना इग्लंडशी
भारतीय महिला हॉकी संघाचा आज पूल सामन्यात घरच्या संघ इंग्लंडशी सामना होणार आहे.
भारतीय खेळाडूंचं आजचं संपूर्ण वेळापत्रक आणि महत्वाचे सामने-
ऍथलेटिक्स
पुरुषांची लांब उडी पात्रता फेरी: एम श्रीशंकर आणि मोहम्मद अनीस याहिया - दुपारी 2:30
महिला शॉटपुट पात्रता फेरी: मनप्रीत कौर - दुपारी 3:30
पुरुष उंच उडी पात्रता फेरी: तेजस्वीन शंकर - दुपारी 12.03 (3 ऑगस्ट)
महिला डिस्कस थ्रो अंतिम सामना: नवजित कौर ढिल्लन आणि सीमा पुनिया- दुपारी 12:52 (3ऑगस्ट)
हॉकी
महिला पूल अ: भारत विरुद्ध इंग्लंड - संध्याकाळी 6:30 वा.
वेटलिफ्टिंग
महिला 76 किलो अंतिम सामना: पूनम यादव - दुपारी 2:00
पुरुष 96 किलो अंतिम सामना: विकास ठाकूर - संध्याकाळी 6:30 वा.
महिला 87 किलो अंतिम: उषा कुमारा - रात्री 11:00
बॉक्सिंग
पुरुष वेल्टरवेट 67 किलो, राऊंड 16: रोहित टोकस विरुद्ध अल्फ्रेड कोट्टे (घाना) - रात्री 11:45 वा.
बॅडमिंटन
मिश्र संघ, अंतिम सामना: भारत विरुद्ध मलेशिया - संध्याकाळी 5:30 वा.
टेबल टेनिस
पुरुष संघ, अंतिम सामना: भारत विरुद्ध सिंगापूर - संध्याकाळी 6.00 वा.
लॉन बॉल
चार महिलांचा संघ, सुवर्णपदक सामना: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - दुपारी 4.15 वा.
स्क्वॅश
महिला एकेरी, प्लेट सेमी-फायनल: सुनैना कुरुविला विरुद्ध फैजा जफर (पाकिस्तान) - रात्री 8:30 वा.
पुरुष एकेरी, उपांत्य फेरी: सौरव घोषाल वि. पॉल कोल (न्यूझीलंड) - रात्री 9.15 वा.
जलतरण
पुरुषांची 200 मीटर बॅकस्ट्रोक: श्रीहरी नटराज - दुपारी 3:00
पुरुषांची 1500 मी. फ्रीस्टाइल: अद्वैत पेज आणि कुशाग्र रावत - दुपारी 4.10
पुरुषांची 200 मीटर बॅकस्ट्रोक अंतिम सामना: (श्रीहरी नटराज पात्र ठरल्यास) - 11:43 वा.
पुरुषांची 100 मीटर बटरफ्लाय, अंतिम सामना: (साजन प्रकाश पात्र ठरल्यास) - मध्यरात्री 12:19 (3 ऑगस्ट)