Year Ender 2022: वर्ल्डकप गमावला पण विराटचा फॉर्म परतला, कसोटी, वनडेपासून ते टी-20 क्रिकेटपर्यंत, टीम इंडियासाठी कसं होतं 2022?
Year Ender 2022: बांगलादेश दोऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं (Team India) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 असा विजय मिळवला.
Year Ender 2022: बांगलादेश दोऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं (Team India) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 असा विजय मिळवला. भारतानं ढाकाच्या शेरे नॅशनल स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या अखरेच्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा पराभव करत यंदाच्या वर्षाचा शेवट गोड केला. दरम्यान, गतवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतानं अनेक मालिका खेळल्या आहेत. ज्यात कसोटी आणि एकदिवसीय आणि टी-20 मालिकांचा समावेश आहे. भारताच्या ओवरऑल परफॉर्मंसवर नजर टाकली असता, यंदाच्या वर्षी संघानं तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल आणि हार्दिक पंड्या यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यावर्षी मैदानात उतरला. भारतानं यावर्षी एकूण सात कसोटी सामने खेळले. यातील चार सामन्यात भारतानं विजय मिळवला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतानं 24 पैकी 14 सामने जिंकले आहेत. तर, टी-20 क्रिकेटमध्ये 40 पैकी 28 सामन्यात भारतानं बाजी मारलीय.
महत्वाच्या सामन्यात पराभव
भारताची यावर्षीची कामगिरी चांगली असली तरी, त्यांना अनेक महत्वाच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात भारतानं दमदार कामगिरी केली. परंत, सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला.
भारतीय खेळाडूंची दुखापतींशी झुंज
या वर्षी भारतीय संघाची सर्वात मोठी समस्या दुखापत ठरली. भारताचे अनेक मोठे खेळाडू दुखापतीमुळं बाहेर संघाबाहेर झाले. दुखपतींमुळं संबंधित खेळाडूला मोठ्या सामन्याला मुकावं लागलं. परिणामी भारताला अनेक सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली होती. ज्यामुळं या मालिकेत भारताचा सलामीवीर केएल राहुलकडं भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं.
दुखापतग्रस्त खेळाडू
या वर्षी भारतीय संघातील दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीवर नजर टाकली तर त्यात मोठ्या आणि आघाडीच्या खेळाडूंची नावे आहेत. ज्यात जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान रोहितला दुखापत झाली होती. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. याच कारणामुळे तो बांगलादेश दौरा पूर्ण न करताच भारतात परतला.
सलग 18वी कसोटी मालिका जिंकली
ढाका येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं बांगलादेशचा तीन विकेट्स राखून पराभव करत मालिका 2-0 अशी जिंकली. या सामन्यात आर अश्विन आणि श्रेयस अय्यरच्या संयमी खेळीमुळे भारतानं बांगलादेशच्या मुठीतून विजय हिसकावून घेत सामना आणि मालिका जिंकली आहे. विशेष म्हणजे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील या विजयानंतर भारतानं एक मोठा विक्रम केला आहे. भारतानं या विजयासोबत आशियामध्ये सलग 18वी कसोटी मालिका जिंकली आहे.
हे देखील वाचा-