KL Rahul, IND vs BAN: बांग्लादेशविरुद्ध मालिकाविजयानंतरही केएल राहुल ट्रोल, सोशल मीडियावर शेअर झाले मजेशीर मीम्स
KL Rahul : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत केएल राहुल संघाचा कर्णधार होता, दरम्यान भारताने मालिका 2-0 ने जिंकूनही कॅप्टन राहुलला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं आहे.
KL Rahul trolled on Socia media : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN Test) यांच्यात खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2-0 असा कडक विजय मिळवला आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधार म्हणून केएल राहुलने संघाचं नेतृत्व केलं. भारताने मालिकाही जिंकली तरी देखील राहुलने संपूर्ण मालिकेत अत्यंत खराब प्रदर्शन केल्यानं त्याला ट्रोलिंगचा धनी व्हावं लागलं आहे. संघाचे नेतृत्व करणारा केएल राहुल फलंदाजीत पूर्णपणे अपयशी दिसला, त्याने दोन्ही सामन्यांच्या एकूण 4 डावात केवळ 57 धावा केल्या.
केएल राहुलवर फॅन्स नाराज
मालिका जिंकल्यानंतरही केएल राहुलवर चाहते चांगलेच संतापले होते. त्याच्या फलंदाजीवर त्याला ट्रोल केलं गेलं. काहींनी त्याच्या फलंदाजीतील कमकुवतपणावर बोट दाखवलं तर काहींनी त्याला वेगळ्या पद्धतीनं ट्रोल केलं. कसोटी क्रिकेटमधलं हे वर्ष त्याच्यासाठी खूप वाईट गेलं. त्याने यावर्षी 4 सामन्यांच्या 8 डावात 17.12 च्या सरासरीने 137 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून फक्त एक अर्धशतक झळकलं आहे. यामुळे नेटीझन्सनी राहुलला ट्रोल करत विविध मीम्स शेअर केले आहेत.
Just an old meme.#KLRahul #INDvsBAN pic.twitter.com/N6K3CL00vh
— Řảɠⱨǎṽ (@raghavKudari) December 24, 2022
KL Rahul as soon as he reaches to crease nowadays #INDvBAN pic.twitter.com/Wnsjs4ib6b
— DJay (@djaywalebabu) December 24, 2022
Even Kl Rahul does not know why he is in playing XI !!! #INDvsBAN pic.twitter.com/2MfH1odgZg
— D (@A7pha_) December 23, 2022
Watching KL Rahul in post match presentation pic.twitter.com/3LR8GZjL6i
— Pakchikpak Raja Babu (@HaramiParindey) December 25, 2022
Thank you KL Rahul pic.twitter.com/baG22pmmim
— Ayush Prajapati (@im_ayush___) December 24, 2022
Cricket fans trying to solve the mystery behind selection of KL Rahul in team pic.twitter.com/xJ3p6TUkh3
— Gajender (@gajender00) December 24, 2022
राहुलची कसोटी कारकीर्द सुमार
2014 मध्ये भारतीय संघात पदार्पण करणारा केएल राहुल संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळताना दिसत आहे. मात्र त्याची कसोटी कारकीर्द आतापर्यंत अत्यंत खराब आहे. त्याची कसोटी सरासरी टी20 आंतरराष्ट्रीय (टी20 आंतरराष्ट्रीय मधील सरासरी 37.75) पेक्षाही कमी आहे. राहुलने आतापर्यंत 45 कसोटी सामन्यांच्या 78 डावांमध्ये 34.26 च्या सरासरीने 2604 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 7 शतकं आणि 13 अर्धशतकं झळकवली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 199 इतकी आहे.
हे देखील वाचा-