WTC Final Scenarios : WTC फायनल रेसमध्ये येणार मोठा ट्विस्ट; भारत, पाकिस्तान एकाच दिवशी कसोटी मैदानात भिडणार, जाणून घ्या समीकरण
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत येत्या काही दिवसात मोठा ट्विस्ट होण्याची शक्यता आहे.
World Test Championship 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत येत्या काही दिवसात मोठा ट्विस्ट होण्याची शक्यता आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील चौथा सामना खेळण्याच्या तयारीत करत आहे. हा सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. या दिवशी केवळ भारत आणि ऑस्ट्रेलियाचेच संघ आमनेसामने येणार नाही तर या दिवसापासून आणखी एक सामना होणार आहे.
ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानचे संघही एकमेकांशी भिडणार आहेत. मात्र, दोन्ही सामन्यांची वेळ वेगळी असणार आहे. त्याच दिवशी तिसरी कसोटीही होणार आहे, पण हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवला जाणार नाही. त्यामुळे या सामन्याच्या निकालाचा WTC गुणतालिकेवर कोणताही परिणाम होणार नाही.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान कसोटी भिडणार
मेलबर्नमध्ये 26 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजल्यापासून भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने येतील. नाणेफेक याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 4.30 वाजता होईल. ही वेळ भारतीय वेळेनुसार आहे, हे लक्षात ठेवा. जर सर्व काही सुरळीत झाले तर दिवसाचा खेळ दुपारी 12 वाजता संपेल. यानंतर दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना सुरू होईल. पाकिस्तानी संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. पाकिस्तानने एकदिवसीय मालिकेत अप्रतिम कामगिरी दाखवत दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली असली तरी आता कसोटीची पाळी आली आहे.
भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे संघ WTC फायनलचे मोठे दावेदार
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे, त्यातील पहिला सामना 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भारतातील हा सामना दुपारी दीडच्या सुमारास सुरू होईल. म्हणजे तोपर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला असेल. हे दोन सामने अधिक महत्त्वाचे झाले आहेत, कारण भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ सध्या WTC फायनलमध्ये जाण्याचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
सध्या हे तिन्ही संघ गुणतालिकेत अव्वल 3 स्थानांवर विराजमान आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ सर्वाधिक पीसीटीसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर तर टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर आहे. या दोन सामन्यांनंतर गुणतालिकेत आणखी एक मोठी चढाओढ पाहायला मिळणार असली तरी अंतिम फेरीचे चित्रही बऱ्याच अंशी स्पष्ट होणार आहे.
टीम इंडिया पुन्हा होणार टेबल टॉपर(WTC Final Scenarios for India)
मेलबर्नमध्ये जर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला हरवले आणि पाकिस्ताननेही अपसेट केले, तर पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल होऊ शकतो. जर भारताने बॉक्सिंग डे कसोटी सामना जिंकला तर गुणतालिकेत त्याचे गुण 55.88 वरून 58.33 (PCT) पर्यंत वाढतील. यासह ऑस्ट्रेलियाचा संघ 58.89 वरून 55.21 गुणांनी कमी होईल. त्याचप्रमाणे पाकिस्तानने जिंकल्यास दक्षिण आफ्रिकेचे गुण 63.33 वरून 57.58 पर्यंत कमी होतील.
हे ही वाचा -