Ajinkya Rahane WTC Final: अजिंक्य रहाणेसमोर 'करो या मरो'ची स्थिती; फ्लॉप ठरल्यास पुन्हा पत्ता कट
WTC Final 2023, Ind vs Aus: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा अजिंक्य रहाणेवर असणार आहेत.
WTC Final 2023: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (ICC World Test Championship Finals) अंतिम सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर आज म्हणजेच, 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. जागतिक क्रमवारीत नंबर वन टीम इंडिया (Team India) आणि नंबर दोन ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात होणाऱ्या या अंतिम सामन्याबाबत सगळेच उत्सुक आहेत. अंतिम सामन्यातही सर्वांच्या नजरा टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज अजिंक्य रहाणेवर असतील.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 18 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर टीम इंडियासाठी पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. प्लेइंग-11 मध्ये रहाणेचं स्थान जवळपास निश्चित झालं आहे. रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गमावल्यानंतर टीम इंडियातून वगळण्यात आलं होतं. कौंटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर पुजारानं राष्ट्रीय संघात पुनरागमन केलं. पण अजिंक्य रहाणे मात्र आपला फॉर्म गमावून बसला होता. त्यामुळे राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यासाठी रहाणेला बराच काळ प्रतीक्षा करावी लागली.
अजिंक्य रहाणेवर दडपण
अजिंक्य रहाणेनं रणजी ट्रॉफी आणि नुकत्याच खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या 16व्या हंगामात चांगली कामगिरी करून राष्ट्रीय संघात पुनरागमन केलं. तसं पाहिलं तर रहाणेला श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळेच पुनरागमन करता आलं. टीम इंडियात अय्यरनं मधल्या फळीत स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्याच्या अनुपस्थितीत मधल्या फळीची जबाबदारी स्विकारण्यासाठी अनुभवी खेळाडूची गरज होती. त्यामुळे अजिंक्य रहाणेला संघात स्थान देण्यात आलं आहे. असं असलं तरीही ज्यावेळी आजपासून सुरू होणाऱ्या WTC चा अंतिम सामना खेळण्यासाठी अजिंक्य रहाणे ओव्हलच्या मैदानावर उतरेल, तेव्हा त्याच्यासाठी करो या मरोचीच स्थिती असेल. रहाणेला पुढील मालिकेसाठी संघातील स्थान निश्चित करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत दमदार खेळी करावीच लागेल.
Emotions on #TeamIndia comeback ☺️
— BCCI (@BCCI) June 3, 2023
Preps for the #WTC23 🙌
Support from family & friends 👍
In conversation with comeback man @ajinkyarahane88 👌👌 - By @RajalArora
Full Interview 🎥🔽
https://t.co/hUBvZ5rvYD pic.twitter.com/vJINbplobY
अजिंक्य रहाणे या संधीचा फायदा उठवण्यात अपयशी ठरला, तर पुढच्या काळात त्याला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळणार नाही. अजिंक्य रहाणेकडून फॅन्ससोबतच बीसीसीआयलाही मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे ज्याप्रकारे रहाणेनं चेन्नईकडून आयपीएलमध्ये खेळत असताना दमदार खेळी केली, तशीच खेळी त्याला WTC मध्ये करावीच लागेल. आतापर्यंत 82 कसोटी सामने खेळलेल्या रहाणेनं 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत टीम इंडियाचं कर्णधारपद भूषवताना कांगारूंना त्यांच्याच घरगुती मैदानावर पराभूत केलं होतं. त्यावेळी टीम इंडियाचं कर्णधारपद भूषवणाऱ्या रहाणेनं सर्वांनाच दखल घेण्यास भाग पाडलं होतं.
अजिंक्य रहाणेची कसोटी सरासरी 40 पेक्षा कमी
ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध 34 वर्षीय अजिंक्य रहाणेनं चांगली कामगिरी केल्याचं वेळोवेळी पाहायला मिळालं आहे. 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत टीम इंडियाचं कर्णधारपद भूषवताना कांगारूंना त्यांच्याच घरगुती मैदानावर त्यानं पराभूत केलं होतं. त्याच्या कामगिरीत सातत्य नसल्यामुळं त्याची कसोटी सरासरी 38.52 आहे. WTC फायनलमध्ये रहाणेवर कर्णधारपदाचं कोणतंही दडपण नसेल, त्यामुळे त्याचं लक्ष फलंदाजीवर असेल. त्यामुळे आता WTC फायनलमध्ये लंडनमधल्या ओव्हल ग्राउंडवर अजिंक्य रहाणेचं वादळ घोंगावणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Focus 👌
— BCCI (@BCCI) June 7, 2023
Intensity ✅
Smiles 😊#TeamIndia geared up for the #WTC23 Final! 👍 👍 pic.twitter.com/wXJipLvDAE
अजिंक्य रहाणेचे आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड्स
• 82 कसोट्या, 4931 धावा, 38.52 सरासरी
• 90 वनडे, 2962 धावा, 35.26 सरासरी
• 20 टी-20, 375 धावा, 20.83 सरासरी
WTC च्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया स्क्वॉड
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशान किशन (विकेटकीपर), केएस भरत (विकेकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट
स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जायसवाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव
महत्त्वाच्या इतर बातम्या :
कसोटी विश्वचषक जिंकाच! जागतिक कसोटी विजेतेपदाची फायनल आजपासून; टीम इंडिया अन् ऑस्ट्रेलिया भिडणार