WTC 2023 Standings : बांगलादेशला व्हाईट वॉश दिल्यावर WTC पॉईंट टेबलमध्ये भारताची स्थिती काय? वाचा सविस्तर
IND vs BAN : बांगलादेश दौऱ्यात भारताने दोन्ही कसोटी सामने जिंकत बांगलादेशला त्यांच्याच भूमीत व्हाईट वॉश दिला आहे. या विजयाचा WTC रँकिंगमध्ये भारताला फायदा झाला आहे.
![WTC 2023 Standings : बांगलादेशला व्हाईट वॉश दिल्यावर WTC पॉईंट टेबलमध्ये भारताची स्थिती काय? वाचा सविस्तर World Test Championship Table Team India latest Standings WTC 2023 after india win over Bangladesh Australia 1st Position WTC 2023 Standings : बांगलादेशला व्हाईट वॉश दिल्यावर WTC पॉईंट टेबलमध्ये भारताची स्थिती काय? वाचा सविस्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/be3c0c62d050d677f8bc287146a1799c1671950379443571_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
WTC Point Table after IND vs BAN Test : बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका 2-0 अशा तगड्या फरकानं जिंकत भारतानं (IND vs BAN) मालिकेत बांगलादेशला क्लिन स्वीप दिली आहे. या विजयामुळे भारताच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पाँईट टेबलमध्ये अर्थात WTC Point Table मध्ये अंतिम फेरीत जाण्याच्या आशा आणखी वाढल्या आहेत. टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये भारताचे सध्याचे स्थान आणि इतर संघाचे स्थान नेमकं जाणून घेऊया...
भारताने बांगलादेश दौऱ्यात आधी चितगाव कसोटी जिंकली तिकडे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला, त्यानंतर भारताने चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले. आता ढाका कसोटीतही विजय मिळवून भारतानं दुसरं स्थान आणखी मजबूत केलं आहे. यंदाच्या वर्षात 8 विजय आणि 2 ड्रॉसह भारताची विजयी टक्केवारी 58.93 इतकी झाली आहे. गुणतालिकेतन दक्षिण आफ्रिका 54.55 टक्के गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. तर ऑस्ट्रेलिया 76.92 टक्के गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
संघ | विजय | पराभव | अनिर्णीत | एकूण गुण | विजयी टक्केवारी |
1. ऑस्ट्रेलिया | 9 | 1 | 3 | 120 | 76.92 |
2. भारत | 8 | 4 | 2 | 99 | 58.93 |
3. दक्षिण आफ्रीका | 6 | 5 | 0 | 72 | 54.55 |
4. श्रीलंका | 5 | 4 | 1 | 64 | 53.33 |
5. इंग्लंड | 10 | 8 | 4 | 124 | 46.97 |
6. वेस्ट इंडीज | 4 | 5 | 2 | 54 | 40.91 |
7. पाकिस्तान | 4 | 6 | 2 | 56 | 38.89 |
8. न्यूझीलंड | 2 | 6 | 1 | 28 | 25.93 |
9. बांगलादेश | 1 | 9 | 1 | 16 | 12.12 |
आगामी कसोटी मालिका भारतासाठी महत्वाची
WTC चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी सध्या फक्त तीन संघ लढत आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे अंतिम फेरीत जाणे जवळपास निश्चित आहे. फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि भारताला चांगली कामगिरी करावी लागेल आणि दुसऱ्या संघाकडून खराब कामगिरीची आशा करावी लागेल. भारताला पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे, जी भारतासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. या मालिकेत भारताने चांगली कामगिरी केल्यास त्यांना कसोटी चॅम्पियनशिपमध्ये चांगले गुण मिळतील आणि अंतिम फेरीत जाण्याच्या त्यांच्या आशा आणखी बळकट होतील.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)