एक्स्प्लोर

World Cup 2019 | विश्वचषकाच्या साखळीत टीम इंडियाचा अखेरचा सामना आज श्रीलंकेशी

श्रीलंकेचा संघ 1999 नंतर पहिल्यांदाच बाद फेरीआधीच गारद झाला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा औपचारिक सामना असला तरी विराटसेनेला मात्र उपांत्य फेरीच्या तयारीसाठी ही चांगली संधी आहे.

लीड्स : विश्वचषकाच्या साखळीत टीम इंडियाचा अखेरचा सामना आज श्रीलंकेशी होत आहे. हा सामना लीड्सच्या हेडिंग्लेवर खेळवण्यात येईल. भारतीय संघानं आठपैकी सहा सामने जिंकून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं तिकीट आधीच कन्फर्म केलं आहे. श्रीलंकेचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळं श्रीलंकेविरुद्धचा हा सामना म्हणजे टीम इंडियासाठी उपांत्य फेरीची पूर्वतयारी ठरणार आहे. भारताची मधली फळी विश्वचषकात सातत्यानं अपयशी ठरली आहे. मधल्या फळीच्या फलंदाजांना त्यांचा आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी या सामन्यात संधी मिळणार आहे. स्ट्राईक रेट उंचावण्यात अपयशी ठरलेल्या धोनीला सूर मिळणं हे टीम इंडियाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. श्रीलंकेचा संघ 1999 नंतर पहिल्यांदाच बाद फेरीआधीच गारद झाला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा औपचारिक सामना असला तरी विराटसेनेला मात्र उपांत्य फेरीच्या तयारीसाठी ही चांगली संधी आहे. विश्वचषकातल्या आठपैकी सहा सामन्यांत टीम इंडियानं बाजी मारली आहे. टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज आणि गोलंदाजांचा प्रभावी मारा हे या यशाचं गमक आहे. पण असं असलं तरी भारतीय संघव्यवस्थापनाला उपांत्य फेरीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी चिंता सतावत आहे. ती म्हणजे मधल्या फळीचं अपयश. मधल्या फळीतल्या केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक या शिलेदारांना मोक्याच्या क्षणी मोठी खेळी उभारण्यात अपयश आलंय. त्यामुळे अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेशविरुद्ध अपेक्षित धावसंख्या उभारता आली नाही. सुदैवानं मधल्या फळीची ही कसर गोलंदाजांनी भरुन काढली आणि इंग्लंडविरुद्धचा अपवाद वगळता टीम इंडियाला उर्वरित सामन्यात विजय साजरा करता आला. केदार जाधवनं या विश्वचषकात 3 डावांत 80, धोनीनं सात डावांत 223, आणि हार्दिक पंड्याला सात डावांत 187 धावाच करता आल्या आहेत. धवनच्या दुखापतीनंतर लोकेश राहुलला सलामीला बढती मिळाली. पण त्याच्या जागी चौथ्या क्रमांकावर संधी मिळालेल्या रिषभ पंतला मोठी खेळी करण्यात अपयश आलं आहे. विश्वचषकाच्या रणांगणात रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि विराट कोहली ही आघाडीची फळी आपली कामगिरी चोख बजावताना दिसत आहे. म्हणूनच उपांत्य फेरीत या आघाडीच्या फलंदाजांना मधल्या फळीची साथ मिळणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे उपांत्य फेरीआधी मधल्या फळीच्या या प्रश्नावर  भारतीय संघव्यवस्थापन काय तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Embed widget