Rohit Sharma: इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 मध्ये रोहित शर्मा खेळणार का? महत्वाची अपडेट समोर
Rohit Sharma: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात येत्या 7 जुलैपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे.
Rohit Sharma: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात येत्या 7 जुलैपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली, ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याचं बीसीसीआयनं यापूर्वीच स्पष्ट केलंय. दरम्यान, भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या टी-20 खेळणार की नाही? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.रोहित शर्मा पहिल्या टी-20 मध्ये खेळण्याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं बर्मिंगहॅम कसोटी सामन्यापूर्वी लिसेस्टशायरविरुद्ध सराव सामना खेळला होता. या सराव सामन्यादरम्यान रोहित शर्माची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याला बर्मिंगहॅम कसोटी सामन्यातून वगळण्यात आलं. येत्या 7 जुलैपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. महत्वाचं म्हणजे, रोहित शर्माची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली, ज्यात त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याकडून महत्वाची माहिती
इनसाइड स्पोर्टशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलंय की, "रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली आहे. रोहितला सावरण्यासाठी वेळ लागेल. रोहित शर्मानं सराव सुरू केलाय. परंतु, रोहित शर्माचं पहिल्या टी-20 मध्ये खेळणं त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे. याबाबत प्रशिक्षक आणि कर्णधार निर्णय घेतील. आम्ही त्याच्याकडून खेळण्याची अपेक्षा करतो."
इंग्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिका वेळापत्रक
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 7 जुलै | एजेस बाउल |
दुसरा टी-20 सामना | 9 जुलै | एजबॅस्टन |
तिसरा टी-20 सामना | 10 जुलै | ट्रेंट ब्रिज |
इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 साठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक
हे देखील वाचा-