NZC: मोठी घोषणा! महिला खेळाडूंनाही पुरुष क्रिकेटपटू इतकेच मानधन मिळणार
NZC: पुरुष क्रिकेटसह आता महिला क्रिकेटलाही मोठी पसंती मिळू लागलीय. दिवसेंदिवसे महिला क्रिकेटबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
NZC: पुरुष क्रिकेटसह आता महिला क्रिकेटलाही मोठी पसंती मिळू लागलीय. दिवसेंदिवसे महिला क्रिकेटबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. याच पाश्वभूमीवर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं महत्वाचा निर्णय घेतलाय. न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटपटूंनाही आता आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उच्चस्तरीय सामन्यांसाठी पुरुष क्रिकेटपटूं इतकेच पैसे मिळणार असल्याची न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं घोषणा केलीय. यापुढे पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान वेतन मिळणार आहे. यासासाठी पाच वर्षाचा करार करण्यात आलाय.
या करारामुळं न्यूझीलंडमधील महिला क्रिकेटपटूंना देण्यात येणाऱ्या करारांची संख्याही वाढते आणि नवोदित खेळाडूंसाठी उपलब्ध स्पर्धात्मक सामन्यांची संख्या वाढते. व्हाईट फर्न्सची कर्णधार सोफी डेव्हाईन म्हणाली की, हा करार महिला क्रिकेटसाठी गेम चेंजर असेल. "आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत महिला खेळाडूंना पुरुषांसोबत समान करारामध्ये मान्यता मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे."
न्यूझीलंडच्या महिला आणि पुरूष क्रिकेट संघाल किती मानधन मिळणार?
कसोटी क्रिकेट- 10 हजार 250 डॉलर ( जवळपास आठ लाख रूपये)
एकदिवसीय क्रिकेट- 4000 डॉलर (जवळपास 3 लाख 15 हजार रुपये)
टी-20 क्रिकेट- 2 हजार 500 डॉलर (जवळपास 2 लाख रुपये)
प्लंकेट शील्ड- एक हजार 750 डॉलर
फॉर्ड ट्रॉफी/हैलीबर्टन जॉनस्टोन शील्ड- 800 डॉलर
सुपर स्मॅश सामने- 575 डॉलर
हे देखील वाचा-