Team India Home Series : रांची कसोटी सामन्यात भारताला विजयासाठी 192 धावांचे आव्हान होतं. 38 षटकात पाच विकेट गमावत भारतानं फक्त 120 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा, यशस्वी जायस्वील, रजत पाटीदार, रवींद्र जाडेजा अन् सरफराज असे आघाडीचे फलंदाज तंबूत परतले होते. शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल मैदानात होते, भारताला विजयासाठी 72 धावांची गरज होती. इंग्लंडचे फिरकी गोलंदाज भेदक मारा करत होते, त्यामुळे सामना अटीतटीचा होणार, असा अंदाज सर्वांनी वर्तवला. पण कठीण परिस्थितीमध्ये शुभमन गिल (नाबाद 52) आणि ध्रुव जुरेल (नाबाद 39) यांनी संयमी खेळी करत विजय मिळवून दिला. रांची कसोटी विजयासह भारताने मालिका 3-1 ने खिशात घातली. अखेरचा कसोटी सामना सात मार्च रोजी धर्मशाला येथे होणार आहे. पण त्याआधीच भारताने कसोटी मालिकेत बाजी मारली. मागील 12 वर्षांत घरच्या मैदानावर भारताचा हा सलग 17 वा कसोटी मालिका विजय होय. तर इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका यासारख्या संघाचा भारताने घरच्या मैदानावर सुपडा साफ केलाय. भारतीय संघ 2013 मध्ये अॅळिस्टर कूकच्या नेतृत्वातील इंग्लंडसंघाविरोधात घराच्या मैदानावर पराभूत झाला होता. पण त्यानंतर भारतीय संघ आतापर्यंत अजेय आहे. मायदेशात भारतीय संघ इतका यशस्वी का झाला? भारतीय संघाचा पराभव करणं इतकं कठीण का आहे? त्याबाबत थोडक्यात जाणून घेऊयात..
फिरकीचं जाळं -
भारताला भारतात पराभव करणं अशक्य आहे. ज्या संघाचे फलंदाज फिरकी चांगले खेळू शकतात, तोच संघ भारताला मायदेशात पराभूत करु शकतो. भारतीय खेळपट्टीवर चौथ्या आणि पाचव्या दिवशी फलंदाजी कऱणं आव्हानात्मक राहतं. काऱण, खेळपट्टीवर चेंडू अधिक टर्न होतो. पण गेल्या काही दिवसांत चेंडू तिसऱ्याच दिवशी जास्त टर्न होत असल्याचं दिसतेय. अनेक चेंडू खाली राहत असल्याचेही दिसले. अशा स्थितीमध्ये फलंदाजांचा फुटवर्क महत्वाचा ठरतो. उसळी घेणाऱ्या वेगवान खेळपट्टीवर खेळणाऱ्या विदेशी फलंदाजांनी फिरकी गोलंदाजीवर खेळणं कठीण जातं. मागील 20 वर्षांत हरभजनसिंह, अनिल कुंबळे, आर. अश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, अमित मिश्रा आणि अक्षर पटेल यासारखे दर्देजार स्पिनर भारतीय संघात खेळले. या गोलंदाजांसमोर खेळं फलंदाजांसाठी कठीण जातं. भारताच्या विजयाचं हे एक मोठं काऱण आहे.
बेंच स्ट्रेंथ -
मागील 12 वर्षांत भारतीय संघ मायदेशात अजेय राहिला, त्याचं आणखी एक कारण म्हणजे मजबूत बेंच स्ट्रेंथ होय. वीरेंद्र सहवागची कमी रोहित शर्मानं भरुन काढली. सचिन तेंडुलकरची कमी विराट कोहलीनं भरली. राहुल द्रविडची कमी चेतेश्वर पुजाराने भरली, आता शुभमन गिल संभाळतोय. गोलंदाजीत.. झहीर खानची जागा जसप्रीत बुमराहने घेतली. सिराजही भेदक मारा करतोय. भज्जी-कुंबळेची जाहा अश्विन-जाडेजा यांनी घेतली. देशांतर्गत क्रिकेटचा अनुभव नेहमीच भारतीय संघासाठी फायद्याचा ठरलाय.
तिसरा 'एक्स' फॅक्टर -
भारतीय क्रिकेटचे चाहते जगभरात आहेत. भारताचा सामना कुठेही असला तरी स्टेडियम फुल्लं होतात. भारतात सामना असेल तर विचारुच नका.. चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद... हा भारताच्या विजयाचा एक्स फॅक्टर आहे. मागील 12 वर्षांत कसोटी क्रिकेट पाहण्यासाठीही भारतीय चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. टीम इंडियाला सपोर्ट करणारे चाहतेही विजयाचा मोठा फॅक्टर आहेत. घरच्या गोंगाटाच्या गर्दीसमोर खेळल्याने पाहुण्या संघांवर दबाव वाढतो, त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर परिणाम होतो. इतकेच नाही तर भारताच्या अनेक भागांतील उष्ण आणि दमट हवामानामुळे पाहुण्या खेळाडूंना, विशेषत: थंड हवामान असलेल्या देशांतून येणाऱ्या खेळाडूंना शारीरिकदृष्ट्या त्रास होऊ शकतो. या परिस्थितीचा कसोटी सामन्यादरम्यान त्याच्या सहनशक्ती आणि एकाग्रतेवर परिणाम होतो.
आणखी वाचा :
- धोनीचा हुकुमी एक्का पुन्हा चमकला, मराठमोळ्या खेळाडूने 11 व्या नंबरवर येऊन शतक ठोकलं!
- IND vs ENG: पाकिस्तानात जन्म, भारतामध्ये गाडले, जॉन राईटनं सांगितली बॅझबॉलच्या अंताची कहाणी!
- शाळेच्या अभ्यासक्रमात रोहित शर्माचा धडा, विश्वास बसत नसेल तर पाहा हे फोटो
- कसोटी खेळणारे होणार मालामाल, BCCI पगारात करणार वाढ, बोनसही देणार!
- IND vs ENG : शुभमन गिलचा पराक्रम, विराट,गंभीरला न जमलेला रेकॉर्ड केला, रोहित आसपासही नाही
- हनुमा विहारीचं कर्णधारपद गेले, नेत्याच्या मुलासोबतचा पंगा पडला महागात!
- ईशान, अय्यरसाठी टीम इंडियाची दारं बंद? रोहित शर्माच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण!
- साहेबांच्या 'बॅझबॉल'चं बँड वाजलं, इंग्लंडनं पहिल्यांदाच गमावली मालिका, रोहितसेनाचा पराक्रम!
- शामीच्या पायाचं झालं ऑपरेशन, IPL आणि T20 वर्ल्ड कपला मुकणार?
- जुरेल आला, उभा राहिला अन् लढला, मग आता आनंद महिंद्रा थार कधी देणार? नेटकऱ्यांचा थेट प्रश्न
- मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी दिलासा, कर्णधार मैदानावर परतला, चार महिन्यानंतर केली गोलंदाजी!