Rohit Sharma featured in 11th Grade Mathematics textbook : भारतीय संघाचा कर्णधार आणि सर्वोत्तम फलंदाज रोहित शर्माचे (Rohit Sharma) जगभरात प्रचंड चाहते आहेत. रोहित शर्मा सध्या इंग्लंडविरोधात (IND vs ENG) पाच सामन्याची कसोटी मालिका खेळत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघानं इंग्लंडचा 3-1 असा पराभव केला. अखेरचा सामना धरमशाला येथे होणार आहे, त्याआधीच रोहित शर्माबाबतची एक बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित शर्माच्या नावाचा धडा शाळेच्या पुस्तकात असल्याचे दिसून येते.
11 वीच्या पाठ्यपुस्तकात रोहित शर्माच्या नावाने धडा -
तामिळनाडूमधील 11वीच्या विद्यार्थ्यांना रोहित शर्माच्या नावाने धडा शिकवला जातोय. गणिताच्या पुस्तकात रोहित शर्माचा धडा आहे. “Balls and Runs. What a celebration, what a relation! What a function! या मथळ्याखाली रोहित शर्माचा धडा आहे. यामध्ये रोहित शर्माची कामगिरी देण्यात आली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल -
रोहित शर्माच्या नावाचा धडा असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. रोहित शर्माचे चाहते यावर प्रतिक्रिया देत आहे. हा फोटो झपाट्यानं व्हायरल होतोय. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
काय आहे नेमकं?
11 वीच्या गणिताच्या पुस्तकात रोहित शर्मावर चॅप्टर आहे. त्यामध्ये रोहित शर्मानं टी 20 क्रिकेटमध्ये ठोकलेल्या शतकाची माहिती देण्यात आली आहे. रोहित शर्मानं 2017 मध्ये श्रीलंकेविरोधात अवघ्या 35 चेंडूत शतक ठोकलं होतं, त्या खेळीचं वर्णन यामध्ये करण्यात आलेय. रोहित शर्मा त्या शतकी खेळीमध्ये 10 चौकार आणि 12 षटकार ठोकले होते. ही खेळी विलक्षण कौशल्य आणि सामर्थ्य दाखवणारी होती. सर्वात लहान फॉरमॅटमध्ये खेळावर वर्चस्व गाजवण्याची रोहितची क्षमता, त्यातून स्पष्ट होत असल्याचं म्हटलेय.
पुस्तकात काय म्हटले ?
रोहित शर्मानं अवघ्या 35 चेंडूमध्ये ठोकलेले रेकॉर्डब्रेक शतक, आता 11 वी वर्गाच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकात सामाविष्ठ करण्यात आलेय. हे शतक रोहित शर्माच्या अविश्वसनीय फलंदाजीचे पराक्रम आणि सर्वात लहान स्वरूपातील खेळावर वर्चस्व गाजवण्याच्या क्षमतेचा पुरावा देतेय. इंदूर येथे 22 डिसेंबर 2017 रोजी श्रीलंकेविरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान रोहित शर्मानं 35 चेंडूत शतक ठोकले. रोहितची खेळी काही नेत्रदीपकांपेक्षा कमी नव्हती, कारण त्याने केवळ 35 चेंडूंमध्ये शतकाचा टप्पा गाठला, जो दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरसह T20I इतिहासातील संयुक्त-जलद शतक आहे. त्याच्या खेळीदरम्यान, रोहितने आपला ट्रेडमार्क मोहक स्ट्रोकप्ले आणि अविश्वसनीय शक्तीचे प्रदर्शन केले, त्याने 10 चौकार आणि एक आश्चर्यकारक 12 षटकार ठोकले.
आणखी वाचा :
- कसोटी खेळणारे होणार मालामाल, BCCI पगारात करणार वाढ, बोनसही देणार!
- IND vs ENG : शुभमन गिलचा पराक्रम, विराट,गंभीरला न जमलेला रेकॉर्ड केला, रोहित आसपासही नाही
- हनुमा विहारीचं कर्णधारपद गेले, नेत्याच्या मुलासोबतचा पंगा पडला महागात!
- ईशान, अय्यरसाठी टीम इंडियाची दारं बंद? रोहित शर्माच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण!
- साहेबांच्या 'बॅझबॉल'चं बँड वाजलं, इंग्लंडनं पहिल्यांदाच गमावली मालिका, रोहितसेनाचा पराक्रम!
- Mohammed Shami Surgery : शामीच्या पायाचं झालं ऑपरेशन, IPL आणि T20 वर्ल्ड कपला मुकणार?
- IND vs ENG : जुरेल आला, उभा राहिला अन् लढला, मग आता आनंद महिंद्रा थार कधी देणार? नेटकऱ्यांचा थेट प्रश्न
- मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी दिलासा, कर्णधार मैदानावर परतला, चार महिन्यानंतर केली गोलंदाजी!