Rohit Sharma Test cricket : रांची कसोटी विजयानंतर रोहित शर्मानं (Rohit Sharma) मोठं वक्तव्य केलेय. रोहित शर्माच्या या वक्तव्यानंतर भविष्यात कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) कोणते खेळाडू खेळताना दिसतील.. कुणाचं दारं बंद झाली. याची चर्चा सुरु झाली आहे. रांची कसोटी विजयानंतर रोहित शर्माला (Rohit Sharma)  भविष्यात कसोटीमध्ये भारताकडून कोणते खेळाडू खेळताना दिसतील, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रोहित शर्मानं मोठं वक्तव्य केले. कसोटी क्रिकेट खेळण्याची ज्याच्यामध्ये भूक आहे, त्याशिवाय कोणताही त्याग करण्यास तयार असेल, अशाच खेळाडूंना भविष्यात संधी दिली जाईल, असं रोहित शर्मानं सांगितलं. त्याशिवाय कसोटी क्रिकेट हा सर्वात कठीण फॉर्मेट असल्याचेही रोहितनं यावेळी सांगितलं. रांची कसोटी (Ranchi Test) विजयानंतर रोहित शर्मा बोलत होता. यावेळी रोहित शर्मानं अप्रत्यक्षपणे ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर निशाणा साधला. 


रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, " कसोटी क्रिकेट खेळण्याची ज्यांच्यामध्ये भूक, अशा खेळाडूंनाच टीम इंडियामध्ये भविष्यात संधी दिली जाईल.  ज्यांना कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा नाही, त्यांना टीम मॅनेजमेंटकडून लक्ष दिलं जाणार नाही. कसोटी क्रिकेट खेळणं सर्वात कठीण काम आहे. या फॉर्मेटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडे क्रिकेट खेळण्याची भूक असायला हवी."






ईशान, अय्यरला रोहितचा मेसेज ?


रोहित शर्मानं वरील वक्तव्य करत ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना एकप्रकारे मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय. इंग्लंडविरोधात कसोटी मालिकेत खेळायचं असेल, तर रणजी क्रिकेट खेळ.. असा मेसेज ईशान किशान याला बीसीसीआय़नं दिला होता. पण ईशान किशन यानं बीसीसीआयच्या या मेसेजकडे दुर्लक्ष केले. दुसरीकडे श्रेयस अय्यरला याला इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेतून वगळल्यानंतरही रणजी खेळण्याचा सल्ला दिला होता. पण श्रेयस अय्यरनं दुखापतीचं कारण देत रणजी खेळणं टाळलं. या दोन्ही खेळाडूंवर बीसीसीआयमधून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये या दोघांचं कमबॅक होणं, कठीण झालंय. आता रोहित शर्मानं अप्रत्यक्षपणे या दोघांना मेसेज दिलाय.


युवा खेळाडूंची दमदार कामगिरी - 


रोहित शर्माच्या नेतृत्वात इंग्लंडविरोधात युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. सरफराज खान, ध्रुव जुरेल आणि आकाशदीप यांना पदार्पणाची संधी मिळाली. या तिघांनीही शानदार कामगिरी केली. भारताच्या विजयात या तिघांनी मोलाची भूमिका बजावली. भारतीय संघाने मालिकात 3-1 च्या फरकानं जिंकली.  आता अखेरचा सामना 7 मार्चपासून होणार आहे. 


आणखी वाचा :


साहेबांच्या 'बॅझबॉल'चं बँड वाजलं, इंग्लंडनं पहिल्यांदाच गमावली मालिका, रोहितसेनाचा पराक्रम!


Mohammed Shami Surgery : शामीच्या पायाचं झालं ऑपरेशन, IPL आणि T20 वर्ल्ड कपला मुकणार? 


IND vs ENG : जुरेल आला, उभा राहिला अन् लढला, मग आता आनंद महिंद्रा थार कधी देणार? नेटकऱ्यांचा थेट प्रश्न


मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी दिलासा, कर्णधार मैदानावर परतला, चार महिन्यानंतर केली गोलंदाजी!