Hardik Pandya Comeback : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मैदानावर परतलाय. त्यानं गोलंदाजी आणि फलंदाजी करत चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. आयपीएल 2024 (IPL 2024) आणि विश्वचषकाआधी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मैदानावर परतल्यामुळे भारतीय चाहते सुखावले आहेत. हार्दिक पांड्या डीवाय पाटील टी20 स्पर्धेतून मैदानावर परतलाय. वनडे विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेदरम्यान हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. 19 ऑक्टोबर रोजी विरोधात पुण्यात झालेल्या सामन्यावेळी हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला होता. तब्बल चार महिन्यानंतर हार्दिक पांड्या मैदानावर परतलाय. 


डीवाय पाटील टी20 स्पर्धेत हार्दिक पांड्याने रिलायन्स 1 संघाचं कर्णधारपद सांभाळलं. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड संघाविरोधात हार्दिक पांड्यानं गोलंदाजी आणि फलंदाजीत हात अजमावला. हार्दिक पांड्यानं गोलंदाजी करताना 3 षटकात 22 धावा दिल्या. यादरम्यान त्यानं दोन फलंदाजांना तंबूचा रस्ताही दाखवला.  हार्दिक पांड्यानं रिलायन्स 1 या सघांसाठी गोलंदाजाची सुरुवात केली. हार्दिक पांड्यानं भेदक मारा करत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना बांधून ठेवलं. 


गोलंदाजीनंतर हार्दिक पांड्यानं फलंदाजीही केली. हार्दिक पांड्यानं 4 चेंडूत नाबाद 3 धावा जोडल्या. हार्दिक पांड्या फलंदाजीसाठी दहाव्या क्रमांकावर उतरला होता. हार्दिकच्या संघाने 15 षटकात 8 विकेटच्या मोबदल्यात 126 धावांचे आव्हान सहज पार केले. हार्दिक पांड्यानं धारधार गोलंदाजी केली, त्याशिवाय फलंदाजीही केली. त्यावरुन तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं दिसतेय. आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्या मुंबई संघाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. त्याशिवाय आगामी टी 20 विश्वचषकासाठी हार्दिक पांड्या तंदुरुस्त असणं भारतीय संघासाठी जमेची बाजू असेल. हार्दिक पांड्या गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये संघाला संतुलित करतो. 


हार्दिक पांड्याच्या अनुपस्थिती सूर्यानं संभाळलं कर्णधारपद -


वनडे विश्वचषकादरम्यान हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव यानं भारतीय टी 20 संघाचं कर्णधारपद संभाळलं. हार्दिक पांड्या मागील काही दिवसांपासून भारताच्या टी20 संघाचं कर्णधारपद संभाळत होता. पण हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर सूर्यकुमार यादव यानं भारतीय टी 20 संघाची धुरा संभाळली होती. ऑस्ट्रेलिया आणिदक्षिण अफ्रिका यांच्याविरोधात सूर्यकुमार यादव यानं भारतीय संघाची धुरा संभाळली. पण अफगाणिस्तानविरोधात रोहित शर्मा टी 20 संघात परतला. त्यानं संघाची धुराही संभाळली. टी 20 विश्वचषकाआधी भारतीय संघाची ही अखेरची आंतरराष्ट्रीय टी20 मालिका होती. आगामी टी20 विश्वचषकात रोहित शर्मा भारतीय संघाची धुरा संभाळणार, हे जवळपास निश्चित झालेय. कारण, काही दिवसांपासून बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एक कार्यक्रमात रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ वर्ल्डकप उंचावले, असं वक्तव्य केले होते.