Team India Salary : भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवली आहे. कसोटी क्रिकेट (Test Cricket) आणि देशांतर्गत क्रिकेट न खेळता काही खेळाडूंचा आयपीएलवर (IPL 2024) जास्त फोकस असतो.  भारतीय संघातील (Team India) अनेक खेळाडूंवर वारंवार हा आरोप केला जातो.  आता कसोटी क्रिकेटला (Test Cricket)  प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआय (BCCI) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या पगारात वाढ करण्याबाबात बीसीसीआय विचार करत आहे. त्याशिवाय कसोटी मालिकेचा भाग असणाऱ्या खेळाडूंना बोनसही दिला जाऊ शकतो.


कसोटी खेळणारे होणार मालामाल -


इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार, आयपीएल 2024 नंतर बीसीसीआय कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या पगारात वाढ करु शकते. त्याशिवाय कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंना बोनसही दिला जाऊ शकतो. अनेक खेळाडू तंदुरुस्त राहण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवत आहेत, त्यामुळे बीसीसीआय हा निर्णय घेणार आहे. नुकताच ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या स्टार खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वादंग निर्माण झाला. याची क्रीडा वर्तुळात चर्चा झाली. रिपोर्ट्सनुसार, ईशान किशन याला बीसीसीआयनं स्पष्ट शब्दात देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची सूचना दिली होती. तरीही ईशान किशन यानं झधारखंडकडून एकही सामना खेळला नाही. दुसरीकडे श्रेयस अय्यर यानेही रणजी चषकातील क्वार्टर फायनल सामन्यातून माघार घेतली. 






किती मिळतो पगार - 


बीसीसीआकडून एका कसोटी सामन्यासाठी खेळाडूंना 15 लाख रुपये दिले जातात. 2016 मध्ये कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंचा पगार दुप्पट केला होता. दुसरीकडे बीसीसीआयकडून एका वनडे सामन्यासाठी सहा लाख रुपये दिले जातात. तर एका टी 20 सामन्यासाठी 3 लाख रुपयांचं मानधन दिलं जातं. भारतीय खेळाडूंना ग्रेडनुसार वार्षिक पगारही दिला जातो. खेळाडूंचा बीसीसीआय बोर्डासोबत करार असतो. 


पगारात होणार वाढ - 


रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 2024 नंतर भारतीय खेळाडूंच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सध्या पाच सामन्याची कसोटी मालिका सुरु आहे. भारताने या कसोटी मालिकेत 3-1 ने आघाडी घेतली आहे. अखेरचा सामना 7 मार्च रोजी धरमशाला येथे होणार आहे. इंग्लंडने पहिला सामना 28 धावांनी जिंकला होता. त्यानंतर भारताने सलग तीन सामन्यात बाजी मारत मालिका खिशात घातली. 


आणखी वाचा :