Bazball IND vs ENG : 2022 मध्ये इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. तीन कसोटी सामन्याच्या मालिकेत इंग्लंडनं एकतर्फी विजय मिळवला. पहिलाच कसोटी सामना 74 धावांनी जिंकला. पहिल्या कसोटीत जॅक क्राउली यानं 111 चेंडूत 122 धावा कल्या, बेन डटेक यानं 110 चेंडूत 107 धावा केल्या, ओली पोपने 104 चेंडूत 108 धावा केल्या. हॅरी ब्रूक्स यानं 116 चेंडूत 153 धावा ठोकल्या. बेन स्टोक्स यानं 18 चेंडूत 41 धावा चोपल्या. ही आकडेवारी आहे, इंग्लंडच्या बॅझबॉलच्या पहिल्या कसोटी सामन्याची. पाकिस्तानमध्ये इंग्लंडच्या या अतिआक्रमक क्रिकेट शैलीनं सर्वांच्या नजरा खिळल्या. सर्वच स्तरावर बॅझबॉलची हवा तयार झाली. बेन स्टोक्स आणि ब्रँडन मॅक्युलम यांच्या जोडीनं तयार केलेल्या या अतिक्रमक क्रिकेट शैलीचा पाकिस्तानमध्ये जन्म झाला.. पण याच शैलीला भारतात गाडले गेले. इंग्लंडची ही अतिआक्रमक शैली भारतामध्ये फेल ठरली. भारताने इंग्लंडचा 3-1 ने पराभव केला. बॅझबॉल आल्यानंतर इंग्लंड सलग सात कसोटी मालिकेत अजेय होता, पण भारताच्या भूमीत त्यांना पराभव पाहावा लागलाय. इंग्लंडच्या बॅझबॉलचं विश्लेषण जॉन राइट यांनी केलेय. त्यांनी इंग्लंडचं बॅझबॉलचा अंत झाल्याची टिप्पणी केली.
4-4 दिवसांतच भारताने जिंकले सामने -
हैदराबाद कसोटीमध्ये भारताचा पराभव करत इंग्लंडनं बॅझबॉल प्रभावी असल्याचं दाखवलं. पण हा अखेरच्या क्षणी सामना फिरली होता. रोहित शर्मानं आपल्या रणनितीमध्ये बदल करत इंग्लंडला जशास तसं उत्तर दिलं. स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये रोहित शर्मानं इंग्लंडच्या बॅझबॉलचा बँड वाजवला. भारताने त्यानंतर तिन्ही कसोटी सामने फक्त चार चार कसोटी सामने जिंकले आहेत.
पाकिस्तानात जन्म, भारतामध्ये गाडले -
इंग्लंडच्या बॅझबॉलचा भारतात शेवट झाल्याची टिप्पणी जॉन राईट यांनी केली आहे. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानमध्ये बॅझबॉलचा जन्म झाला अन् भारतीय संघाने त्यांना गाडलं. इतिहासात असेच म्हटले जाईल.. ज्यावेळी इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला, तेव्हा यजमानांचा त्यांनी धुव्वा उडवला. बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाची अवस्था अतिशय बिकट झाली. सगळा देश बाबारच्या नेतृत्वाच्या विरोधात झाला होता. प्रत्येक फॉर्मेटसाठी वेगळा कर्णधार करा, अशी मागणीही तेव्हा पुढे आली. बाबरचं कर्णधारपद जाण्यास हे महत्वाचं कारणही ठरलं.
बॅझबॉलचा प्रवास -
पाकिस्तानमधून बॅझबॉल पर्वाला सुरुवात झाल्यानंतर इंग्लंडचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला. तिथं त्यांनी मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. आयर्लंडविरोधात मायदेशात मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियाविरोधात अॅशेस मालिका बरोबरीत सोडली. त्यानंतर बॅझबॉलची चर्चा क्रीडा विश्वात सुरु जाली. भारताच्या मैदानातही इंग्लंड याच अतिआक्रमक शैलीनं खेळणार का? इंग्लिश क्रिकेटरकडून मोठं मोठी वक्तव्य आली. पण मालिकेचा निकाल आता सर्वांसमोर आले. भारताने इंग्लंडच्या अतिआक्रमक शैलीची वाट लावलीच, त्याशिवाय ब्रँडन मॅक्युलमच्या या थेरीचा सत्यानाथ केला.
दिग्गज मालिकेबाहेर, तरीही रोहितसेनेचा विजय
विराट कोहली, केएल राहुल (हैदराबाद सामना फक्त खेळला), जसप्रीत बुमराह (रांची टेस्टमध्ये आराम), मोहम्मद शमी (दुखापतग्रस्त), ऋषभ पंत (दुखापतग्रस्त), चेतेश्वर पुजारा (ड्रॉप), अजिंक्य रहाणे (ड्रॉप) यासारखे दिग्गज नसतानाही भारताने मालिका 3-1 जिंकली आहे. रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान आणि आकाश दीप या चार नवख्या खेळाडूंनी पदार्पण केले. दिग्गजांच्या अनुपस्थितीतही रोहितसेनेने इंग्लंडच्या बॅझबॉलचा गाशा गुंडाळला. हे कौतुकास्पद आहे.
पाच सामन्याची कसोटी मालिका भारताच्या खिशात -
शुभमन गिल आणि ध्रुव जुरेलनं सहाव्या विकेटसाठी रचलेल्या 72 धावांच्या अभेद्य भागिदारीनं भारताला चौथ्या कसोटी सामन्यासह मालिकाही जिंकून दिली. या कसोटीत भारतानं इंग्लंडचा पाच विकेट्सनी पराभव केला. या विजयासह भारतानं पाच कसोटी सामन्यांची 3-1 अशी जिंकली. या कसोटीत इंग्लंडनं भारताला विजयासाठी 192 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं चौथ्या दिवसअखेर बिनबाद 40 धावांची मजल मारली होती. पण आज भारताचा निम्मा संघ 120 धावांत माघारी परतला आणि कसोटी सामन्याचं पारडं पुन्हा दोलायमान झालं. त्या परिस्थितीत शुभमन गिल आणि ध्रुव जुरेलनं 72 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शुभमननं 124 चेंडूंत नाबाद 52 आणि ध्रुव जुरेलनं 77 चेंडूंत नाबाद 39 धावांची खेळी उभारली. ध्रुव जुरेलला या कसोटीतल्या सर्वोत्तम खेळाडूचा मान देण्यात आला.
आणखी वाचा :
- शाळेच्या अभ्यासक्रमात रोहित शर्माचा धडा, विश्वास बसत नसेल तर पाहा हे फोटो
- कसोटी खेळणारे होणार मालामाल, BCCI पगारात करणार वाढ, बोनसही देणार!
- IND vs ENG : शुभमन गिलचा पराक्रम, विराट,गंभीरला न जमलेला रेकॉर्ड केला, रोहित आसपासही नाही
- हनुमा विहारीचं कर्णधारपद गेले, नेत्याच्या मुलासोबतचा पंगा पडला महागात!
- ईशान, अय्यरसाठी टीम इंडियाची दारं बंद? रोहित शर्माच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण!
- साहेबांच्या 'बॅझबॉल'चं बँड वाजलं, इंग्लंडनं पहिल्यांदाच गमावली मालिका, रोहितसेनाचा पराक्रम!
- शामीच्या पायाचं झालं ऑपरेशन, IPL आणि T20 वर्ल्ड कपला मुकणार?
- जुरेल आला, उभा राहिला अन् लढला, मग आता आनंद महिंद्रा थार कधी देणार? नेटकऱ्यांचा थेट प्रश्न
- मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी दिलासा, कर्णधार मैदानावर परतला, चार महिन्यानंतर केली गोलंदाजी!