Shubman Gill, IND vs ENG : शुभमन गिल याच्या कसोटी करिअरमध्ये चढ उतार पाहायला मिळाला. इंग्लंडविरोधातील (IND vs ENG) हैदराबाद कसोटी सामन्यात फ्लॉप गेल्यानंतर  शुभमन गिल (Shubhaman Gill) याला वगळण्याचा सल्लाही अनेकांनी दिला. कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, वेस्ट इंडिज दौरा आणि दक्षिण आफ्रिकामध्ये शुभमन गिल याची बॅट शांतच होती. त्यात मायदेशात इंग्लंडविरोधात सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. त्यामुळे त्याच्यावर टीका होत होती. पण दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक, तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 91 धावा आणि आता चौथ्या कसोटीतही शानदार अर्धशतक ठोकत त्यानं आपला क्लास दाखवला. रांची कसोटीतील शानदार 52 धावांच्या खेळीच्या बळावर शुभमन गिल यानं अनेक विक्रमांना गवसणी घातली. विराट आणि गौतम गंभीर या सारख्या दिग्गजांना न जमलेला पराक्रम त्यानं केलेय. रोहित शर्मा तर या विक्रमाच्या आसपासही नाही.


विराट कोहली, गौतम गंभीरला टाकले मागे - 


शुभमन गिल यानं कसोटी करिअरमध्ये आतापर्यंत 24 सामने खेळले आहेत. पण चौथ्या डावात धावा करणाऱ्या खेळाडूमध्ये मोठं स्थान पटकावलं आहे. चौथ्या डावात धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये शुभमन गिल यानं विराट कोहली आणि गौतम गंभीर यासारख्या मातब्बर फलंदाजांना मागे टाकलेय. 24 कसोटी सामन्यापैकी सहा कसोटी सामन्यात शुभमन गिल यानं चौथ्या डावात फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिलाय. या सहा सामन्यात शुभमन गिल यानं चौथ्या डावात 70 च्या सरासरीने 210 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेस आहे. 


 विराट कोहली आणि गौतम गंभीर यांनी चौथ्या डावात (भारताने जिंकलेल्या) प्रत्येकी 8-8 वेळा फलंदाजी केली. यामध्ये त्यांच्या बॅटमधून 179-179 धावा निघाल्या आहेत. दोघांना प्रत्येकी एक एक अर्धशतक ठोकता आलेय. भारतीय कर्णधार रोहित शर्मा तर आसपासही नाही. रोहित शर्माने पाच डावात 134 धावा केल्या आहेत.  जिंकलेल्या कसोटी सामन्यातील चौथ्या डावात भारताकडून सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. सचिन तेंडुलकरने 715 धावा चोपल्या आहेत. 


चौथ्या डावात गिल होतो आक्रमक - 


कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजीसाठी खेळपट्टी सोपी असते. पण जसजसा खेळ पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी अधिक कठीण होत जाते. चौथ्या डावात फलंदाजी करणं तर अधीच कठीण असतं. पण याच चौथ्या डावातील सर्वोत्तम विक्रम शुभमन गिलच्या नावावर आहे. सामन्याच्या पहिल्या डावात त्याची सरासरी 20.72, दुसऱ्या डावात 31.23, तिसऱ्या डावात 43.90 आणि चौथ्या डावात 44.14 अशी आहे.  


रांची कसोटीत भारताची इंग्लंडवर पाच विकेट्सने मात


शुभमन गिल आणि ध्रुव जुरेलनं सहाव्या विकेटसाठी रचलेल्या 72 धावांच्या अभेद्य भागिदारीनं भारताला चौथ्या कसोटी सामन्यासह मालिकाही जिंकून दिली. या कसोटीत भारतानं इंग्लंडचा पाच विकेट्सनी पराभव केला. या विजयासह भारतानं पाच कसोटी सामन्यांची 3-1 अशी जिंकली. या कसोटीत इंग्लंडनं भारताला विजयासाठी 192 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं चौथ्या दिवसअखेर बिनबाद 40  धावांची मजल मारली होती. पण आज भारताचा निम्मा संघ 120 धावांत माघारी परतला आणि कसोटी सामन्याचं पारडं पुन्हा दोलायमान झालं. त्या परिस्थितीत शुभमन गिल आणि ध्रुव जुरेलनं 72  धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शुभमननं 124 चेंडूंत नाबाद 52 आणि ध्रुव जुरेलनं 77 चेंडूंत नाबाद 39  धावांची खेळी उभारली. ध्रुव जुरेलला या कसोटीतल्या सर्वोत्तम खेळाडूचा मान देण्यात आला.  


आणखी वाचा :



हनुमा विहारीचं कर्णधारपद गेले, नेत्याच्या मुलासोबतचा पंगा पडला महागात!


ईशान, अय्यरसाठी टीम इंडियाची दारं बंद? रोहित शर्माच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण!


साहेबांच्या 'बॅझबॉल'चं बँड वाजलं, इंग्लंडनं पहिल्यांदाच गमावली मालिका, रोहितसेनाचा पराक्रम!


Mohammed Shami Surgery : शामीच्या पायाचं झालं ऑपरेशन, IPL आणि T20 वर्ल्ड कपला मुकणार? 


IND vs ENG : जुरेल आला, उभा राहिला अन् लढला, मग आता आनंद महिंद्रा थार कधी देणार? नेटकऱ्यांचा थेट प्रश्न


मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी दिलासा, कर्णधार मैदानावर परतला, चार महिन्यानंतर केली गोलंदाजी!