Anand Mahindra Dhruv Jurel : रांची कसोटी सामन्यात युवा ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) यानं सर्वांची मनं जिंकली. ध्रुव जुरेल यानं दोन्ही डावात महत्वाची खेळी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. चौथ्या कसोटी सामन्यात त्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) भारताच्या विजयाचा हिरो ठऱला. ध्रुव जुरेल यानं पहिल्या डावात 90 धावांची खेळी केली, तर दुसऱ्या डावात नाबाद 39 धावा केल्या. ध्रुव जुरेल याच्या दमदार खेळीनं सर्वांनाच प्रभावित केले. ध्रुव जुरेल याच्या फलंदाजीनं प्रभावित होऊन मॉरिस गॅरेज (Morris Garages) ऑटोमोटिव्ह कंपनीनं कौतुक करणारं ट्वीट केलेय.  MG मोटर्सच्या ट्वीटनंतर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. नेटकऱ्यांनी त्यांना गाडी गिफ्ट न देण्यावरुन ट्रोल केलेय. तिसऱ्या कसोटी सामन्यावेळी दोन्ही डावात अर्धशतके ठोकणाऱ्या सरफराज खान याला आनंद महिंद्रा यांनी थार गाडी गिफ्ट केल्याचं समोर आलं होतं. त्यावरुन नेटकऱ्यांनी आता ध्रुव जुरेल याला थार का दिली नाही? असा सवाल उपस्थित केलाय. 


MG मोटर्सने ध्रुव जुरेलला गिफ्ट केली महागडी गाडी- 


ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये 50 च्या सरासरीनं धावांचा पाऊस पाडला. त्यामुळेच त्याला इंग्लंडविरोधात कसोटी मालिकेत टीम इंडियात स्थान मिळालं. युवा ध्रुव जुरेल यानं चौथ्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी केली. दोन्ही डावात त्यानं महत्वाचं योगदान दिलं. त्याशिवाय विकेटच्या मागेही त्यानं शानदार कामगिरी केली. त्यामुळे प्रभावित होत मॉरिस गॅरेज (Morris Garages) ऑटोमोटिव्ह कंपनीने ध्रुव जुरेल याला MG Hector कार गिफ्ट दिली आहे. एक्सवर त्यांनी याबाबतची घोषणा केली. 


चाहत्यांनी आनंद महिंद्र यांना केलं ट्रोल -


मॉरिस गॅरेज (Morris Garages) कंपनीद्वारे ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) याचं कौतुक करण्यात आले.  त्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांना चाहत्यांनी ट्रोल केले. सरफराज खान यांनं तिसऱ्या कसोटीतील दोन्ही डावात शानदार कामगिरी केली होती. त्यामुळे आनंद महिंद्रा यांनी सरफराज खान याला थार गाडी गिफ्ट केली. त्यावरुन आता चाहत्यांनी आनंद महिंद्रा यांना ट्रोल केले. ध्रुव जुरेल याच्यासाठी एमजी हेक्टर येत आहे... थारपेक्षा चांगली... असं एका चाहत्यानं म्हटलेय. 


भारताची इंग्लंडवर पाच विकेट्सने मात


शुभमन गिल आणि ध्रुव जुरेलनं सहाव्या विकेटसाठी रचलेल्या 72 धावांच्या अभेद्य भागिदारीनं भारताला चौथ्या कसोटी सामन्यासह मालिकाही जिंकून दिली. या कसोटीत भारतानं इंग्लंडचा पाच विकेट्सनी पराभव केला. या विजयासह भारतानं पाच कसोटी सामन्यांची 3-1 अशी जिंकली. या कसोटीत इंग्लंडनं भारताला विजयासाठी 192 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं चौथ्या दिवसअखेर बिनबाद 40  धावांची मजल मारली होती. पण आज भारताचा निम्मा संघ 120 धावांत माघारी परतला आणि कसोटी सामन्याचं पारडं पुन्हा दोलायमान झालं. त्या परिस्थितीत शुभमन गिल आणि ध्रुव जुरेलनं 72  धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शुभमननं 124 चेंडूंत नाबाद 52 आणि ध्रुव जुरेलनं 77 चेंडूंत नाबाद 39  धावांची खेळी उभारली. ध्रुव जुरेलला या कसोटीतल्या सर्वोत्तम खेळाडूचा मान देण्यात आला.