Tanush Kotian and Tushar Deshpande : तनुष कोटियन आणि तुषार देशपांडे यांनी रणजी स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मुबईकडून खेळणाऱ्या या गोलंदाजांनी फलंदाजीत सर्वोच्च योगदान दिलेय. दहाव्या आणि अकराव्या क्रमांकावर फलंदाजी करताना या दोघांनी शतकं ठोकली आहे. रणजी क्रिकेटच्या इतिहासात असा पराक्रम पहिल्यांदाच झालाय. मराठमोळ्या तुषार आणि तनुष यांनी अकराव्या क्रमांकावर 232 धावांनी भागिदारी केली.  बडोद्याविरोधात तुषार देशपांडे आणि तनुष कोटियन यांनी विक्रमी फलंदाजी केली. अकराव्या विकेटसाठी दोघांनी तब्बल 232 धावांची भागिदारी केली. 


धोनीचा हुकुमी एक्का, चेन्नईचा आघाडीचा गोलंदाज तुषार देशपांडे यांन बडोद्याविरोधात अकराव्या क्रमांकावर शतकी खेळी केली. तुषार देशपांडे यानं 129 चेंडूचा सामना करताना शतक ठोकले. यामध्ये 10 चौकार आणि आठ षटकारांचा समावेश आहे. तुषार देशपांडे याने 123 धावांची विक्रमी खेळी केली. त्याशिवाय दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तनुष कोटियन यानं 129 चेंडूमध्ये दहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद  120 धावा चोपल्या. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दहाव्या आणि अकराव्या क्रमांकाच्या खेळाडूंनी शतक ठोकण्याची दुर्मिळ गोष्ट घडली आहे. याआधी 1946 मध्ये दहाव्या आणि अकराव्या क्रमांकाच्या खेळाडूंनी शतक ठोकले होते. चंजू सरवटे आणि सूट बॅनर्जी यांनी अनुक्रमे 124 आणि 121 धावांची खेळी करत इतिहास रचला होता. आता 78 वर्षानंतर हा विक्रम मोडला. 


तनुष कोटियन भारताच्या अंडर 19 संघाचा सदस्य राहिलाय. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तनुष मुंबईकडून खेळतो.  फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तनुष यानं आतापर्यंत 10 अर्धशतकं ठोकली आहे, पण त्याचं हे पहिलंच शतक ङोय. तनुष यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये 38 च्या सरासरीने 915 धावा चोपल्या आहेत. दुसरीकडे तुषार देशपांडेही मुंबईचा सदस्य आहे. तर आयपीएलमध्ये तो चेन्नईच्या संघाचा सदस्य आहे. 2022 मध्ये तुषारला चेन्नईने 20 लाख रुपयांमध्ये खरेदी केले.  






मुंबईची शानदार कामगिरी


रणजी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुंबई  आणि बडोदा यांच्यात सामना सुरु आहे. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने पहिल्या डावात 384 धावा केल्या. मुंबईकडून मुशीर खान यानं द्विशतक ठोकले. मुशीर खान यानं 203 धावांची खेळी केली. त्याशइवाय हार्दिक तोमरे यानं अर्धशतक ठोकले. इतर फलंदाजांना अपयश आलं. मुंबईनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बडोद्यानं 348 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर दुसऱ्या डावात मुंबईनं 569 धावा चोपल्या आहेत. आता बडोद्याला विजयासाठी 600 धावांची गरज आहे. 


आणखी वाचा :