Hanuma Vihari Andhra Pradesh : क्रिकेटर हनुमा विहारीला आंध्र प्रदेश संघाचं (Andhra Pradesh) कर्णधारपद गमावावं लागलेय. त्याला कारण, संघातील 17 व्या क्रमांकाच्या खेळाडूला फटकारणं महागात पडलेय. हनुमा विहारीनं (Hanuma Vihari) इन्स्टाग्राम पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. रणजी चषकात (ranji trophy 2024) हनुमा विहारी आंध्र प्रदेश संघाचं नेतृत्व करत होता. पण त्याला अचानक कर्णधारपदावरुन पायउतार व्हावं लागलं. हनुमा विहारी यानं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आपलं दु:ख व्यक्त केलेय. हनुमा विहारीनं ज्या खेळाडूचा उल्लेख केलाय, त्यानं आपल्यामुळं विहारीचं कर्णधारपद गेल्याचं आरोप फेटाळला.


हनुमा विहारीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय की, "आम्ही चांगली लढत दिली. पण पुन्हा एकदा आंध्र प्रदेश संघाला क्वार्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पश्चिम बंगालविरोधात पहिल्या सामन्यात मी संघाचा कर्णधार होतो. पण त्यावेळी मी 17 व्या क्रमांकाच्या खेळाडूला झापलं. त्या खेळाडूनं वडिलांकडे तक्रार केली. त्याचे वडील राजकीय नेता होता. त्यामुळे माझ्याकडे बोर्डानं राजीनामा मागितला."


हनुमा विहारीचे गंभीर आरोप -


त्या खेळाडूविरुद्ध माझं वैयक्तिक कोणतेही भांडण नव्हतं. मी त्याला काही तसं बोललोही नाही. संघ माझ्यासाठी पहिला आहे. पण बोर्डासाठी तो खेळाडू महत्वाचा आहे. एक खेळाडू संघापेक्षा मोठा झालाय. सात वर्ष मी या संघासाठी सर्वकाही दिलं. यादरम्यान मी टीम इंडियासाठी सात कसोटी सामनेही खेळलो. याआधीह संघासोबत काही गोष्टी वाईट झाल्या आहेत पण या सर्व गोष्टी असूनही मी संघाशी जोडलेला आहे. आतापर्यंत मी काही बोललो नव्हतो. पण हे जे काही झालं ते खूप अति झालं. आम्ही संघ म्हणून चांगली कामगिरी करत आहोत, पण बोर्डाला हे पाहावत नाही, असे हनुमा विहारीने आरोप केले आहेत. 






तो खेळाडू आला समोर, दिलं स्पष्टीकरण - 


हनुमा विहारीनं आरोप केलेला खेळाडू प्रसारमाध्यमाच्या समोर आला. त्याचं नाव परुधवी राज असे आहे. त्यानं सोशल मीडियावर म्हटलेय की, हनुमा विहारीनं केलेले आरोप चुकीचे आहोत. माझ्या अथवा इतर कुणापेक्षाही क्रिकेट मोठं आहे. त्या दिवशी नेमकं काय झालं, हे संघातील सर्वांनाच माहिती आहे. हनुमा विहारी आता सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानं आपत्तीजनक शब्दात मला शिविगाळ केली होती. 


आंध्र प्रदेशच्या राजकारणात खळबळ - 


हनुमा विहारीच्या पोस्टनंतर आंध्र प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. टीडीपीच्या नेत्यानं आंध्र प्रदेश क्रिकेट बोर्ड आणि सत्ताधारी पक्षावर आरोप केले आहेत.  त्याशिवाय सोशल मीडियावरही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काहींनी हनुमा विहारी ऑस्ट्रेलियामध्ये दुखापत असतानाही लढल्याचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. 
 










आणखी वाचा :


ईशान, अय्यरसाठी टीम इंडियाची दारं बंद? रोहित शर्माच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण!


साहेबांच्या 'बॅझबॉल'चं बँड वाजलं, इंग्लंडनं पहिल्यांदाच गमावली मालिका, रोहितसेनाचा पराक्रम!


Mohammed Shami Surgery : शामीच्या पायाचं झालं ऑपरेशन, IPL आणि T20 वर्ल्ड कपला मुकणार? 


IND vs ENG : जुरेल आला, उभा राहिला अन् लढला, मग आता आनंद महिंद्रा थार कधी देणार? नेटकऱ्यांचा थेट प्रश्न


मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी दिलासा, कर्णधार मैदानावर परतला, चार महिन्यानंतर केली गोलंदाजी!