Mithali Raj : 'त्या' दिवशी सर्वात पहिल्यांदा निवृत्तीचा विचार मनात आला होता; माजी कर्णधार मिताली राज म्हणाली...
भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू मिताली राजने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, दोन दशकांहून अधिक काळ मैदान गाजवल्यानंतर तिने हा निर्णय घेतला.
Mithali Raj Retirement : महिला क्रिकेट जगतातील एक आघाडीची क्रिकेटर म्हणजे भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज (Mithali Raj). भारतीय महिला संघासाठी (Team India) तब्बल 23 वर्षे क्रिकेट खेळलेल्या मितालीने 8 जून रोजी सोशल मीडियाद्वारे घोषणा करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 39 वर्षीय मितालीने आपल्या निवृत्तीबाबत बोलताना नक्की हा रिटायरमेंटचा विचार कधी मनात आला होता, याबद्दलही खुलासा केला आहे. 2012 साली दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडला (Rahul Dravid) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताना पाहून मनात निवृत्तीचा (Retirement) विचार आल्याचं मितालीने सांगितलं आहे.
मिताली 2012 सालच्या त्या क्षणांना आठवताना म्हणाली, 'महान भारतीय क्रिकेटर राहुल द्रविडने (Rahul Dravid) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यावेळी राहुल अत्यंत भावूक झाला असून त्याचे डोळेही पानावले होते. दमर्यान राहुलला इमोशनल पाहून माझ्याही मनात रिटायरमेंटचा विचार आला होता. त्यावेळी मी विचार केला की मी जेव्हा निवृत्ती घेईन तेव्हा मला कसं वाटेल. मी देखील अशीच भावूक होईन का? हे सर्व विचार माझ्या मनात त्यावेळी आले होते.''
निवृत्ती घेताना काय म्हणाली मिताली?
टीम इंडियाची धडाकेबाज फलंदाज 39 वर्षीय मिताली राजनं आज म्हणजेच, 8 जून 2022 रोजी ट्विटरवरुन आपल्या निवृत्तीची घोषणा केली. एक पत्र तिनं ट्वीट करत शेअर केलं आहे. मितालीनं तिच्या मेसेजमध्ये लिहिलं आहे की, जेव्हा मी निळ्या रंगाची जर्सी घालून माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केलं, तेव्हा मी लहान होते. हा प्रवास सर्व प्रकारचे क्षण पाहण्यासाठी पुरेसा होता. गेली 23 वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक होती. इतर प्रत्येक प्रवासाप्रमाणे हा प्रवासही संपत आहे आणि आज मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे.
हे देखील वाचा-