एक्स्प्लोर

Ind vs Ireland: 'अखेर मेहनतीचं फळ मिळालंच!' भारतीय संघात स्थान मिळालेल्या राहुल त्रिपाठीची प्रतिक्रिया

Ind vs Ireland: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ आयर्लंडशी दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.

Ind vs Ireland: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ आयर्लंडशी दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयनं बुधवारी भारतीय संघाची घोषणा केली आहे. आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदरबादकडून चारशेहून अधिक धावा काढणारा त्रिपाठी हा एकमेव नवा चेहरा या संघात आहे.  याचप्रमाणे राजस्थान रॉयल्सला अंतिम फेरीपर्यंत नेणारा कर्णधार सॅमसनलाही कारकीर्द सावरण्याची आणखी एक संधी मिळालीय. भुवनेश्वर कुमार हा संघाचा उपकर्णधार आहे. या दौऱ्यात भारतीय संघात स्थान मिळालेल्या राहुल त्रिपाठीनं आपली प्रतिक्रिया दिलीय.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात राहुल त्रिपाठीनं धमाकेदार फलंदाजी केली. त्यानं 158.24 च्या स्फोटक स्ट्राइक रेटनं आणि 37.55 च्या फलंदाजीच्या सरासरीनं 413 धावा केल्या. मात्र, तरीही त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी मिळाली नाही. यावर माजी क्रिकेटपटूंपासून क्रिकेट चाहत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, आता त्याची आयर्लंड दौऱ्यासाठी निवड झाल्यानं या प्रश्नांना पूर्णविराम लागलाय.

राहुल त्रिपाठी काय म्हणाला?
राहुल त्रिपाठी म्हणाला की 'ही खूप मोठी संधी आहे. हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. मी खूप आनंदी आहे की निवडकर्त्यांनी आणि सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी आजवर केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. मला आशा आहे की मला खेळण्याची संधी मिळाली तर मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन.

राहुल त्रिपाठीची कारकिर्द
राहुल त्रिपाठीनं 2017 पासून आयपीएल खेळत आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू आहे. त्यानं आतापर्यंत 76 सामन्यांमध्ये 28.09 च्या फलंदाजीची सरासरी आणि 140.80 च्या स्ट्राइक रेटनं त्यानं 1 हजार 798 धावा केल्या आहेत. राहुलनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही 2 हजार 540 धावा केल्या आहेत. ज्यात सात शतक आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर लिस्ट-ए सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 1 हजार 209 धावा आहेत. प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी 30 पेक्षा जास्त आहे. तो महाराष्ट्राकडून देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळतो.

आयर्लंड दौऱ्यात भारतीय संघ-
हार्दिक पांड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), यजुर्वेद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 Sri Lanka: BCCI ने काढले, आता श्रीलंकेच्या टीमसोबत; टीम इंडियाच्या 2 माजी प्रशिक्षकांनी ऑस्ट्रेलियाला विश्वचषकातून केले बाहेर, सनथ जयसूर्याने सगळं सांगितलं!
टीम इंडियाच्या 2 माजी प्रशिक्षकांनी ऑस्ट्रेलियाला विश्वचषकातून केले बाहेर, सनथ जयसूर्याने सगळं सांगितलं!
India Super-8 Schedule : भारतासमोर समोर सुपर 8 मध्ये कोणाचं आव्हानं? 'या' दिवशी झिम्बॉब्वे विरुद्ध सामना, संपूर्ण वेळापत्रक 
भारतासमोर समोर सुपर 8 मध्ये कोणाचं आव्हानं? 'या' दिवशी झिम्बॉब्वे विरुद्ध सामना, संपूर्ण वेळापत्रक 
Vaibhav suryavanshi: तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
इमरान खान यांच्यासाठी एकवटले माजी कर्णधार, कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र
इमरान खान यांच्यासाठी कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र...

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमानाचा स्फोट का झाला?; रोहित पवारांनी सांगितलं हादरवणारं कारण, पत्रकार परिषद घेऊन पुन्हा गौप्यस्फोट
अजितदादांच्या विमानाचा स्फोट का झाला?; रोहित पवारांनी सांगितलं हादरवणारं कारण, पत्रकार परिषद घेऊन पुन्हा गौप्यस्फोट
Muslim Reservation: एकीकडे 'सबका साथ, सबका विकास' म्हणायचे अन् दुसरीकडे मुस्लिमांच्या आरक्षणाच्या वाटा बंद करायच्या, मुस्लिम आरक्षण रद्द झाल्यानंतर काँग्रेसची टीका
एकीकडे 'सबका साथ, सबका विकास' म्हणायचे अन् दुसरीकडे मुस्लिमांच्या आरक्षणाच्या वाटा बंद करायच्या, मुस्लिम आरक्षण रद्द झाल्यानंतर काँग्रेसची टीका
Rahul Narvekar Land in Alibag: राहुल नार्वेकर कुटुंबीयांचं अलिबागवर विशेष प्रेम, 60 एकरपेक्षा जास्त जमिनीची खरेदी
राहुल नार्वेकर कुटुंबीयांचं अलिबागवर विशेष प्रेम, 60 एकरपेक्षा जास्त जमिनीची खरेदी
Jalgaon News : चिमुकल्याने खेळताना मुकुट समजून ॲल्युमिनियमचं भांडं डोक्यात घातलं अन् भलतंच घडलं; डॉक्टरांनी धोका पत्करून प्लंबरच्या मदतीने यशस्वी सुटका!
चिमुकल्याने खेळताना मुकुट समजून ॲल्युमिनियमचं भांडं डोक्यात घातलं अन् भलतंच घडलं; डॉक्टरांनी धोका पत्करून प्लंबरच्या मदतीने यशस्वी सुटका!
Ajit Pawar Meets Amit Shah NCP Merger: अमित शाहांकडून अजितदादांना मिळालेला हिरवा कंदील; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत नेमकी काय चर्चा झालेली?
अमित शाहांकडून अजितदादांना मिळालेला हिरवा कंदील; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत नेमकी काय चर्चा झालेली?
AI Impact Summit: AI समिटमध्ये PM मोदी येणार म्हणून लॉकडाऊन केला अन् चोरट्यांकडून स्टॉलवरील AI प्रॉडक्ट अवघ्या काही मिनिटात हडप! सीईओचा डोक्याला हात, आता पोलीस म्हणतात....
AI समिटमध्ये PM मोदी येणार म्हणून लॉकडाऊन केला अन् चोरट्यांकडून स्टॉलवरील AI प्रॉडक्ट अवघ्या काही मिनिटात हडप! सीईओचा डोक्याला हात, आता पोलीस म्हणतात....
Bhiwandi Mahangarpalika Election: भिवंडीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या गुप्त हालचाली, भाजप नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्लॅन, महायुतीत अंतर्गत नाराजी
भिवंडीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या गुप्त हालचाली, भाजप नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्लॅन, महायुतीत अंतर्गत नाराजी
bhigwan kidnapping case: भिगवणमधील तरुणीच्या अपहरणप्रकरणात नवा ट्विस्ट; मुलासोबत मोबाईलवर संभाषण, मेसेजवरही बोलायची; पोलिसांच्या माहितीने नवं वळण
भिगवणमधील तरुणीच्या अपहरणप्रकरणात नवा ट्विस्ट; मुलासोबत मोबाईलवर संभाषण, मेसेजवरही बोलायची; पोलिसांच्या माहितीने नवं वळण
Embed widget